Rajpal Yadav in legal trouble : बॉलिवूडचा विनोदवीर अभिनेता रामपाल यादव (Rajpal Yadav) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका विद्यार्थ्याने अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानूसार रामपालने फक्त विद्यार्थ्याच्या स्कूटरला धडक दिली नाही, तर जेव्हा विद्यार्थ्याने विरोध केला तेव्हा रामपालने  त्याला मारहाण केल्याची घटना समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने अभिनेत्याविरोधात केलेली तक्रार रामपालला भोवणार का? हे येत्या काळात कळेल.  (rajpal yadav net worth)


काय आहे पूर्ण प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना प्रयागराज मधील आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बालाजी या विद्यार्थ्याने कर्नलगंज पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 'मी विश्वाविद्यालय बँक रोडच्या जवळ काही पुस्तकं खरेदी करत होतो. तेव्हा त्याठिकाणी शुटिंग सूरु होती. जेथे रामपाल यादव स्टूटर चालवत होता. अभिनेत्याला स्कूटर नीट चालवता आली नाही. त्यानंतर अचानक त्याने माझ्या दुचाकीला धडक दिली.' (rajpal yadav wife)


बालाजी पुढे म्हणाला, 'अभिनेत्याला माफी मागायला हवी होती. पण असं न करता त्याने मला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी विरोध केल्यानंतर यूनिटच्या लोकांनी देखील मला मारायला सुरुवात केली. एवढंच नाही, तर मला जीवे मारण्याची देखील धमकी दिली.' (rajpal yadav directed movies)


रामपालच्या युनिटनेही केला विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल
रामपालच्या युनिटच्या म्हणण्यानुसार, 'परवानगी घेतल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी शुटिंग करत होतो. तेव्हा बालाजी नावाचा मुलगा तेथे आला आणि नकार देवूनही त्याच्या मोबाईलमध्ये शूट करत होता. जेव्हा त्याल्या थांबवण्याचा प्रयत्न तेव्हा त्याने युनिटच्या लोकांना मारहाण केली.' (rajpal yadav height)


स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आणि अभिनेता रामपाल यादव - अभिनेत्याचं युनिट अशा दोन्ही बाजू जाणून घेल्यानंतर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.