``तो सरळ माझा हात धरून....`` रस्त्यावर घडलेल्या त्या घटनेनंतर अभिनेता थक्क
`भुलभुलैया` चित्रपटात तर अक्षय कुमारपेक्षाही राजपाल यादवचीच हवा होती.
मुंबईः गेली अनेक वर्षे आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा प्रसिद्ध कॉमेडीयन अभिनेता राजपाल यादव घराघरात लोकप्रिय आहे. 'भुलभुलैया' चित्रपटात तर अक्षय कुमारपेक्षाही राजपाल यादवचीच हवा होती. अक्षय कुमारला जेवढी प्रसिद्धी त्या चित्रपटातून मिळाली त्याहूनही जास्त प्रसिद्धी राजपाल यादवला मिळाली. आजही 'भुलभुलैया' चित्रपटाची आठवण आली की अक्षयसोबतच राजपालचेही नावं तोडांवर येते. 'भुलभुलैया २' मध्ये राजपालचा अवतार पाहून लोकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. कॉमेडी टायमिंग किंग म्हणून राजपाल यादवची ओळख आहे.
'हेराफेरी', 'चुप चुप के', 'भुलभुलैया' अशा अनेक विनोदी चित्रपटातून काम केल्यानंतरही लॉकडाऊनच्या काळात मात्र राजपाल फारसा चित्रपटांतून दिसला नव्हता. त्यानंतर 'भुलभुलैया २' मधून तो पुन्हा एकदा बॉलीवूडच्या बीग स्क्रिनवर आला. बीग स्क्रिनवर काम केल्यानंतर आता अनेक बॉलीवूड कलाकार ओटीटीवरही येत आहेत. राजपाल यादवदेखील आता ओटीटीवर आला आहे. त्याची नुकतीच 'अर्ध' ही वेबमालिका झी ५ वर आली होती. ज्यात राजपाल यादवने किन्नरची भुमिका केली आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे साडी नेसून दागिने घालून आणि टिकली लावून राजपाल स्त्री भुमिका केली. ज्याच्यामुळे तो ट्रोलही झाला.
आपली भुमिका फार जास्त खरी वाटावी म्हणून राजपाल खरोखरच रस्त्यावर जाऊन किन्नरप्रमाणे भीक मागायला सुरूवात केली. तेव्हा त्याला आलेला विचित्र अनुभव राजपाल स्वतःहूनच सांगितला, तो म्हणाला, "मी भुमिका अधिक खरी वाटावी म्हणून रस्त्यावर साडी घालून फिरत होतो. अशावेळीच एक माणूस जवळ आला, तेव्हा मला वाटलं की तो पैसे द्यायला आला आहे पण त्याएवजी त्याने माझा हात घरला आणि जोरात त्याच्या गाडीच्या आत ओढायला सुरूवात केली. आणि तो मला म्हणाला... "तू बहोत अच्छी लगती हैं"...चल...." राजपाल त्याचा हात धरूनच होता. त्या माणसाला कळलेच नाही की तो राजपाल यादव आहे. राजपाल त्याचा हात सोडायचा खूप प्रयत्न केला पण तो माणूस काही ऐकतच नव्हता. शेवटी कसाबसा राजपाल त्याच्या तावडीतून सुटला..
'अर्ध'च्या माध्यमातून राजपाल यादवने ओटीटीवर पदार्पण केले आहे. लवकरच राजपालचे चार नवीन हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.