या लोकप्रिय कॉमेडिअनच्या घरी चिमुकलीचं आगमन
हटके पद्धतीने शेअर केली ही गोड बातमी
मुंबई : आता बॉलिवूडमध्ये #metoo चं वादळ सुरू असताना याच बॉलिवूडमधून आनंदाची बातमी चाहत्यांना मिळाली आहे. या वादळापूर्वी बॉलिवूडमधील अनेक कलाकार लग्न करत होते कुणी आई - बाबा होण्याच्या तयारीत होते असं असताना एका प्रसिद्ध कॉमेडिअनने गोड बातमी शेअर केली आहे. आपल्या सगळ्यांना मनमुराद हसवणारा राजपाल यादवला मुलगी झाल्याचं त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.
महत्वाचं म्हणजे राजपालने अगदी हटके पद्धतीने ही गोष्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या मोठ्या मुलीचा एक फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. त्यामध्ये राजपालच्या मोठ्या मुलीने 'Big Sister ' असं लिहिलेलं टिस्टर घातलं आहे.
नवरात्रीच्या अतिशय मंगलदिनी यादव कुटुंबियांच्या घरी आणखी एका परीचं आगमन झालं आहे. आपल्या कॉमिकपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या राजपालने करिअरची सुरूवात ही 1999 मध्ये 'दिल क्या करे' या सिनेमातून केली. सिनेमात मोठ्या भूमिका मिळत नसल्यातरी लहान भूमिकेतून त्याने आपली स्वतःची ओळख निर्माण केली.