नवी दिल्ली: संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती च्या प्रमोशनसाठी काढण्यात आलेली रांगोळी सेना समर्थकांनी उधळून लावली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सूरतच्या मॉलमध्ये ४८ तास मेहनत करून बनविलेली रांगोळी रजपूत करणी सेना समर्थकांनी पूर्णपणे उधळून लावली आहे. या घटनेनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण नाराज झाली असून तिने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ट्विट केले आहे.  "हे आता बंद असले पाहिजे, यांच्यावर कठोर कारवाई आवश्यक आहे." असे तिने ट्विटमध्ये लिहिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान दीपिकाने या उध्वस्त केलेल्या रांगोळीचे फोटो ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.



  'हे लोक कोण आहेत? त्यांच्या कृतीसाठी कोण जबाबदार आहे? या सर्व गोष्टींकडे आम्ही किती काळ दुर्लक्ष करणार आहोत? ' असा प्रश्न तिने संतापाने विचारला आहे.



  एका व्यक्तीने दीपिकाच्या ट्विटवर रिट्विट केले. "हे काय आहे? अशी विचारणा त्याने केली आहे. 



प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सुरतमधल्या मॉलमधील ही रांगोळी करण नावाच्या कलाकाराने ४८ तासांची मेहनत घेवून पद्मावती रंगोली बनविली होती. पण मॉलमधील काहीजण आपल्या पायांनी ती रांगोळी पुसून टाकत असल्याचे दिसत आहे.
करणने या घटनेसंबंधी ट्वीट करुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून मदतीची मागणी केली आहे.



शूटिंगच्यावेळापासून पद्मावती सिनेमा वादात अडकला आहे.



'पद्मावती'च्या सेटला आग लावण्याचे प्रयत्न झाले तसेच निर्माते संजय लीला भंसाली यांनाही मारहाण करण्यात आली.याशिवाय संजय लीला भंसालीचे पुतळेही जाळण्यात आले.
हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग, शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोण हे प्रमुख भूमिकेत आहेत.


 




दीपिका पदुकोण राजमाता रानी पद्मावती यांच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे. संजय लीला भन्सालीने चित्रपटात इतिहासाची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला  आहे. पद्मावतींचे आक्रमणकर्त्या अलाउद्दीन खिलजीशी कोणतेही संबंध नव्हते अशी बाजू आंदोलनकर्ते मांडत आहेत.