मुंबई : जवळपास 20 दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेले प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. राजू श्रीवास्तव यांना गेल्या तीन दिवसांपासून खूप ताप येत होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहून त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. त्याचबरोबर आता विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबतच्या नव्या अपडेटनुसार त्यांची प्रकृती हळूहळू बरी होत आहे. तसंच तीन दिवसांपासून सतत ताप येणार ताप आता हळूहळ कमी होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी आहे तब्येत?
राजूच्या तब्येतीचे अपडेट शेअर करत डॉक्टरांनी सांगितलं होतं की, त्यांना 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप आहे. आणि विनोदी कलाकार अजूनही बेशुद्ध आहे. त्याचबरोबर, एका आठवड्यापूर्वी समोर आलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, कॉमेडियनला हृदयविकाराच्या झटक्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा शुद्धी आली. याउलट, राजूच्या भावाने लोकांना विनंती केली होती की, त्यांनी सर्व बातम्यांना अफवा म्हणून फॉलो करावं, फक्त राजूच्या सोशल मीडिया अपडेट्सचे अनुसरण करावं आणि कनेक्ट राहावं. 


यूपी सरकारचं मोठं पाऊल
राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीकडे चाहत्यांसह यूपी सरकारचीही नजर आहे. तसंच कॉमेडियनची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टर सतत प्रयत्नशील असतात. या पार्श्वभूमीवर आता यूपी सरकारने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. राजू श्रीवास्तव यांच्याकडे पाहण्याची जबाबदारी सरकारने निवासी आयुक्तांवर सोपवली आहे. यूपी रेजिडेंटनं एम्समध्ये उपस्थित राजूच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्याच्या आरोग्याची माहिती घेतली.


10 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल
कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. राजू श्रीवास्तव अजूनही कोमात असल्याची माहिती मिळाली. राजू यांची प्रकृती सुधारण्यासाठी न्यूरोफिजिओथेरपीची मदत घेतली जात आहे. त्याची प्रकृती सुधारावी यासाठी चाहते सतत प्रार्थना करत आहेत.