Raju Srivastava Death News: जवळपास 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रीवास्तव यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, कुठे आशेचा किरण दिसतो तोच नियतीनं त्यावर घाला घातला. श्रीवास्तव यांच्या निधनानं त्यांची मुलगी आणि पत्नी या दोघींवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू श्रीवास्तव (Raju shrivastava family) यांचं कुटुंबावर प्रचंड प्रेम. लेकिप्रती त्यांच्या मनात प्रेमासोबतच प्रचंड आदराचीही भावना होती आणि का नसावी. तिनं कामगिरीच तशी केली होती. कमी वयात श्रीवास्तव यांच्या मुलीनं केलेल्या कामगिरीसाठी तिचा खुद्द तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. 


(Raju Srivastav) श्रीवास्तव यांच्या लेकिनं म्हणजेच अंतरानं केलेली कामगिरी सर्वांनाच तिची नवी ओळख करुन देणारी ठरली. वयाच्या अवग्या 12 व्या वर्षी मोठं धाडस दाखवत, स्वत:च्या आईला चोरट्यांपासून वाचवलं होतं. 


जेव्हा घरात घुसलेले चोर.... 
राजू श्रीवास्तव यांची पत्नी आणि त्यांची लेक घरात असतानाच चोरट्यांनी डाव साधला आणि ते घरात घुसले. त्यांच्याकडे बंदुक होती, जी श्रीवास्तव यांच्या पत्नीवर रोखली होती. तेव्हाच अंतरा बेडरूममध्ये आली आणि तिथून तिनं वडिलांसह पोलिसांनाही फोन केला. 


इतकंच नव्हे, तर बेडरुमच्या खिडकीतून तिनं वॉचमनलाही इशारा करत पोलिसांना फोन करण्यास सांगितलं. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी श्रीवास्तव यांच्या पत्नीसह त्यांच्या मुलीची चोरांच्या तावडीतून सुटका केली. घरावर ओढावलेलं दरोड्याचं संकटही यावेळी टळलं. 


वाचा : 'यमराजही घ्यायला आला...' कॉमेडियन Raju srivastava यांचा शेवटचा Video Viral


समयसूचकता आणि शौर्याची अनोखी सांगड घालत अंतरानं केलेल्या या कामगिरीची दखल केंद्रानंही घेतली. 2006 मध्ये तिचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.



श्रीवास्तव यांची लेक सध्या काय करते? (Raju Srivastav Daughter) 
अंतरानं फ्लाइंग ड्रीम एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेडमध्ये अंतरानं सहाय्यक निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून काम पाहिलं आहे. सध्या मात्र आपल्या कामापासून दूर राहत तिनं  संपूर्ण लक्ष वडिलांच्या प्रकृतीकडे देण्याला प्राधान्य दिलं होतं. आता येत्या दिवसांमध्ये अंतराचा हा खंबीरपणाच तिच्या आईसाठी मोठा आधार असेल.