मुंबई : गेल्या 40 दिवसांपासून विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. रोज त्यांच्या प्रकृतीबद्दल नवे अपडेट समोर येत आहे. राजू कधी ठणठणीत होतील आणि पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करतील याच प्रतीक्षेत चाहते आणि कुटुंब आहेत. आता राजू यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे. हृदय विकाराचा झटका आल्यापासून ते बेशुद्ध आहेत. गेल्या 40 दिवसांपासून रुग्णालयात असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दिपू श्रीवास्तव यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. (Raju Srivastava Health update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू श्रीवास्तव अद्याप का नाही आले शुद्धीवर? 
राजू यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नसल्यामुळे ते अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. राजू सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. राजू यांचा भाऊ दीपू यांच्या म्हणण्यानुसार, राजू यांच्या डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटर काढण्यासाठी अनेकदा विचार केला, पण वारंवार ताप येत असल्याने राजू यांना  अद्यारही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे. (raju srivastava is still unconscious on ventilator)


दिपू श्रीवास्तव म्हणाले, 'राजू यांची प्रकृती सुधारण्यास वेळ लागत आहे. पण आम्हाला विश्वास आहे की, राजू लवकरच ठिक होतील. सध्या राजू व्हेंटिलेटरवर आहेत...'  (Dipu Srivastava on Raju Srivastava's health)


कशी आहे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती?  (Raju Srivastava's health update)
राजू अद्यापही शुद्धीवर न आल्यामुळे कुटुंब आणि चाहते चिंतेत आहेत. जोपर्यंत राजू श्रीवास्तव शुद्धीवर येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबद्दल काहीही सांगता येणार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ते गेल्या 40 दिवसांपासून रुग्णालयात आहेत. 


राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने सोशल मीडियाद्वारे व्हीडिओ शेअर करून माहिती दिली की, ते बरे होत आहेत आणि डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांची सतत काळजी घेत आहे. (raju srivastava is still unconscious on ventilator)