मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत. डॉक्टरांची टीम अभिनेत्याच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे कॉमेडियनचे चाहतेही यांच्या तब्येतेती सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. दरम्यान, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता नक्कीच वाढू शकते. राजू श्रीवास्तव यांचा एमआरआय रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात दुखापत होण्याचे कारण मेंदूमध्ये ऑक्सिजन न पोहोचू शकणे आहे. (Raju Srivastava Health Update)


आणखी वाचा : अभिनेत्रीचा बाथटबमधला बोल्ड लूक ठरतोय चर्चेचा विषय, पाहा Viral Photo


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू श्रीवास्तव यांची नवीन हेल्थ अपडेट त्यांच्या एमआरआय रिपोर्ट संबंधित आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा अभिनेत्याला एमआरआयसाठी व्हेंटिलेटर रूममधून नेण्यात आले. ज्याचा रिपोर्ट आला असून त्यात अभिनेत्याच्या डोक्याच्या वरच्या मेंदूच्या भागात अनेक डाग आढळून आले आहेत. या स्पॉट्स जखमा असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. या स्पॉट्समागील कारण म्हणजे मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न होणे. हे स्पॉट्स नॉर्मल  करण्यासाठी डॉक्टर वैद्यकीय उपाय करणार आहेत.


आणखी वाचा : 'ज्या चित्रपटात शाहरुख खान तो फ्लॉपच', सलमानच्या चाहत्यांचा Shahrukh ला विरोध


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर


राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खूप मंदावली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याला शुद्धीवर येण्यासाठी सुमारे एक ते दोन आठवडे लागतील. एमआरआय रिपोर्टमध्ये मेंदूच्या एका भागात दिसणारे हे स्पॉट्स दुखापतीमुळे आलेले नाहीत. सुमारे 25 मिनिटे ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने हा प्रकार घडला आहे. या अहवालानुसार, राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूच्या खालच्या भागावर याचा कमी परिणाम झाला आहे. ज्यामध्ये हात-पाय, डोळ्याची बाहुली आणि घशात थोडी हालचाल होते.