TMKOC Rakesh Bedi Landslide Video: पृथ्वीवर अनेक नैसर्गिक घटना घडताना दिसतात. त्यातीलच एक म्हणजे भूस्खलन. सध्या उत्तरेत आपल्याला अशा अनेक घटना पाहायला मिळताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर असे नाना तऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. त्या व्हिडीओंकडे पाहूनही आपल्याला फार धस्स व्हायला होते आणि भिती वाटते. त्यावेळी त्या भूस्खलनात अडकलेल्या लोकांचे मात्र काय होतं असेल याची आपल्याला काहीच कल्पना येणार नाही. त्यामुळे अशावेळी आपल्याला याची प्रचिती येतेच. तिथे फिरायला जाण्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घेणेही फार गरजेचे असते. सध्या अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्यानं आपला हिमाचल प्रदेशमधील भुस्खलनाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे परंतु हा किस्सा ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडीओ हा सर्वत्र चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता का उल्टा का चष्मा' ही मालिका सर्वत्र गाजते आहे. ही मालिका गेली 15 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. याच मालिकेतील बाबूलाल ही भुमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी आपला थरारक अनुभव शेअर केला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ते म्हणाले की, ''''तुम्ही हे ऐकलेच असेल की शिमला, हिमाचल प्रदेशमध्ये भूस्लखानाचा फारच वाईट परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे. कितीतरी जोरात भलेमोठे पर्वत हे खाली येताना दिसत आहेत. सर्व रस्ते यामुळेच बंद झाले आहेत आणि अनेक गाड्याही अडकून पडल्या आहेत. मी दोन आठवड्यापुर्वी सोलनला अभिनयावर लेक्चर द्यायला गेलो होतो. तेव्हा आम्ही जेव्हा परत येत होतो तेव्हा दरड कोसळल्यामुळे आमचा संपुर्ण रस्ता हा बंद झाला होता. त्यामुळे आम्ही शॉटकर्ट निवडला.''


सोनम कपूरचं 173 कोटींचं सासरचं घर का आहे चर्चेत? हेही वाचा : याला म्हणतात सुखात नांदणे! सोनम कपूरच्या नवऱ्याचं 173 कोटींचं घर पाहिलं का?


पुढे ते म्हणाले की, ''आम्ही जेव्हा शॉटकर्ट घेतला तेव्हा आमच्या समोर फार मोठा दगड आला. देवाच्या कृपेनं तो आमच्या गाडीवर पडला नाही. त्यानंतर मी अगदी ही - मॅन बनण्याचा प्रयत्न केला होता. त्या रस्त्याच्या कडेला मी गेलो आणि तिथून मी तो दगड सरकवायचा प्रयत्न करत होतो. तो पुढे सरकला परंतु परत मागे आला. त्यातच माझं बोट अडकलं. माझं बोटं तुटलंच असतं. ते एका बाजूनं लटकत होतं. आता ही दुखापत बरी झाली आहे. परंतु त्यानंतर आम्ही जेसीबीच्या मदतीनं रस्ता मोकळा केला.''


पाहा व्हिडीओ : 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Gadar 2 मध्येही त्यांनी भुमिका केली आहे. सोबतच त्यांनी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातूनही भुमिका केली आहे. त्यातून 'श्रीमान श्रीमती' ही मालिकाही तुम्हाला आठवत असेल त्यातही ते प्रमुख भुमिकेत दिसले होते.