Rakesh Roshan Announced His Retirement : अभिनय आणि दिग्दर्शनातून सगळ्यांच्या मनात घर करणारे राकेश रोशन यांनी आता मोठी घोषणा केली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला तर आता त्यांनी दिग्दर्शनातून कायमचा ब्रेक घेतल्याचं म्हटलं आहे. त्यांनी बॉलिवूड क्विट केलं आहे याचा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. राकेश रोशन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'क्रिश 4' ची घोषणा केली पण ते आता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार की नाही याविषयी जास्त काही माहिती दिली नाही. पण त्यांच्या या मुलाखतीतून एक गोष्ट कळली की ते यापुढे ते कोणताही चित्रपट करणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेश रोशन यांनी ही मुलाखत 'बॉलिवूड हंगामा'ला दिली आहे. त्यांना वाटत नाही की ते यापुढे काही दिग्दर्शन करतील पण लवकरच ते क्रिश 4 ची घोषणा करणार आहेत. यावेळी राकेश रोशन म्हणाले, 'मला वाटत नाही की मी भविष्यात कोणत्या चित्रपटाचं दिग्दर्शन करेन. मात्र, हे नक्की की लवकरच क्रिश 4 ची घोषणा करेन.' दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं हे सांगत शेअर केलं  की 'हो, तो येतोय.' त्यामुळे हा देखील अंदाज वर्तवला जात आहे की या चित्रपटाचं दिग्दर्शनं सिद्धार्थ आनंद करण्याची शक्यता आहे. 


राकेश रोशन यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या साय-फाय चित्रपट 'कोई मिल गया' यातून पदार्पण केलं. त्या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 21 वर्ष झाली आहेत. पहिल्या भागात हृतिक रोशन महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेत्री प्रीति झिंटा दिसली. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यात हृतिकसोबत प्रियांका चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. तर तिसऱ्या भागात कंगना रणौत त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. त्यामुळे आता चौथ्या भागात कोणती अभिनेत्री दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर राकेश रोशन यांनी सगळ्यात शेवटी 'क्रिश 3' चं दिग्दर्शन केलं होतं. 


हेही वाचा : लेक इरासोबत आमिरही घेतोय थेरेपी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


दरम्यान, आता चौथ्या भागात कोणती अभिनेत्री दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे हृतिक रोशनविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'वॉर 2' आणि 'क्रिश 4' मध्ये दिसणार आहे. तर गेल्या चार वर्षांपासून 'क्रिश 4' ची चर्चा सुरु होती.