लेक इरासोबत आमिरही घेतोय थेरेपी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Aamir Khan Taking Joint Therapy with Daughter Ira : आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 18, 2024, 07:24 PM IST
लेक इरासोबत आमिरही घेतोय थेरेपी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan Taking Joint Therapy with Daughter Ira : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान हा सध्या चित्रपटांमुळे नाही तर वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असतो. तर आता त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे त्याचं खासगी आयुष्य आहे. आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक असा खुलासा केला आहे. ज्याविषयी जाणून कोणालाही मोठा झटका बसेल. 

नेटफ्लिक्स इंडियाच्या एका व्हिडीओमध्ये आमिरनं त्याची लेक इरा खान आणि डॉक्टर विवेक मुर्ती यांच्याशी मेंटल हेल्थवर चर्चा केली. त्याशिवाय त्यानं थेरेपीकडे सकारात्मक पद्धतीनं पाहण्याचा दृष्टीकोण बनवण्यासाठीचं सगळं श्रेय हे इराला दिलं. त्यानं सांगितलं की एका खास थेरेपी घेतल्यामुळे त्याचं आणि त्याच्या लेकीचं नातं खास ठरलं. त्याशिवाय थेरेपीला घेऊन लोकांना वेगवेगळे सल्ले देखील दिले. मी माझी लेक इरासोबत थेरेपी घेतोय. आमच्या नात्यात जे काही गोष्टींवर मतभेद असतात, ते दूर करण्यावर आम्ही काम करतोय. आधी मला या सगळ्या गोष्टींवर चर्चा करताना संकोच वाटत होता, पण आता मला कळलंय की हे किती गरजेचं आहे. मी लोकांना सांगेन की थेरेपिस्टला भेटण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संकोच करु नका. मी काय आज थेरेपी घेत नाही आहे, तर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही दोघे थेरेपिस्टकडे जातोय. हे खूप चांगलं आहे आणि त्याचा फायदा देखील होतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आमिरनंतर त्याची लेक इरा यावर म्हणाली की ही आई-वडिलांसोबत असलेलं नातं टिकवून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. अशा प्रकारे आमिर खान आणि इरा खाननं थेरेपीवर त्याचं मत काय आहे ते सांगितलं. 

हेही वाचा : आयुष्मान खुरानानं स्वत: च्या वडिलांना म्हटलं हुकमशाह; लहाणपनीच्या Trauma ला आठवत म्हणाला, 'बेल्ट आणि चप्पलनं...'

दरम्यान, आमिरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर लाल सिंह चड्ढानंतर जवळपास 2 वर्ष आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून स्वत: ला दूर केलं आहे. त्यामुळे आता आमिर बरेच मोठे प्रोजेक्ट घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार असल्याची प्रेक्षकांना आशा आहे. आमिरच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'गजनी 2', 'सितारे जमीन पर', 'कुली' आणि 'लाहौर 1947' मध्ये दिसणार आहे. तर त्याचा 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचं दिग्दर्शन हे आर एस प्रसन्ना यांनी केलं आहे. हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.