मुंबई : सुपर डान्सर जज आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चे पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी एडल्ट फिल्म बनवण्याच्या आरोपावरून अटक केली आहे. 23 जुलैपर्यंत राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Rakh Sawant supports Shilpa Shetty Raj Kundra Says people are trying to fethch Money ) पोर्नोग्राफी प्रकरणावर बॉलिवूडमधून प्रतिक्रिया येत असताना आता चर्चेत असलेल्या अभिनेत्रीने देखील आपलं मत या प्रकरणावर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री राखी सावंतने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज कुंद्राच्या या प्रकरणावर राखी सावंतने पाठिंबा दिला आहे. पापाराजीसोबत बोलताना राखी म्हणाली,'राज कुंद्रा अतिशय मेहनती आहे. शिल्पा शेट्टीने अतिशय मेहनत करून हे यश मिळवलं आहे. माझं या दाम्पत्याला संपूर्ण समर्थन आहे. शिल्पावर देखील लावलेले आरोप खोटे असल्याचं राखी म्हणाली.'


राखी सावंत म्हणाली, 'असं काही नाही, काही लोक राज कुंद्रा आणि दिग्गज शिल्पा शेट्टींकडून पैसे हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी तुझ्यावर प्रेम करते शिल्पा. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. मला आठवते शिल्पा शेट्टी यांनी खूप कष्ट केले. त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज कुंद्राने असं काही केलं असतं यावर माझा विश्वास नाही. तो एक आदरणीय व्यक्ती आहे.



शिल्पाने राखी सावंतला मदत केलीय


तसेच राखी सावंत यांनी सांगितले की शिल्पा शेट्टी यांनी तिला कामात मदत केली आहे. तिने सांगितले की तिचे 'क्रेझी 4' मधील 'तुझे टुक देखे' या आयटम साँगची मुळात शिल्पाला ऑफर करण्यात आली होती, पण शिल्पाने राकेशचे नाव राकेश रोशन यांना सुचवले.


नुकत्याच झालेल्या प्रकरणावर मुंबई पोलिसांनी सांगितले की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई क्राइम ब्रँचमध्ये अश्लील चित्रपट बनविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही ऍप्सद्वारे हे चित्रपट बनवले जातात व प्रकाशित केले जातात असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणात राज कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. आयुक्तांनी सांगितले की, तपासणी दरम्यान असे आढळले की राज कुंद्रा हा या रॅकेटचा मुख्य आरोपी आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांना अनेक ठोस पुरावे मिळाले आहेत. यानंतर त्याला सोमवारी अटक करण्यात आली.