राखी माझ्यासाठी भाग्यवान - पती रितेशचा खुलासा
अद्यापही राखीचा पती कॅमेऱ्यासमोर आलेला नाही.
मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असेत. कधी गायक मीका सिंगच्या बर्थडे पार्टीत रंगलेला किसींग वाद तर कधी स्वयंवरच्या माध्यमातून परदेशी मुलासह बांधलेली लग्न गाठ. काही दिवसांपूर्वी राखीच्या लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. परंतु राखीच्या वादग्रस्त वागणुकीमुळे तिच्यावर कोणीच विश्वास ठेवला नव्हता. तिने सांगितले होते की 'मी एका रितेश नावाच्या उद्योगपतीसोबत लग्न केले आहे.'
परंतु, अद्यापही राखीचा पती कॅमेऱ्यासमोर आलेला नाही. पण आता राखीने लग्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. राखीच्या पतीने नुकताच स्पॉटबॉयला मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला.
रखीबद्दल बोलताना तो म्हणाला की, 'राखी कॅमेऱ्यासमोर कशीही असली तरीही ती कॅमेऱ्यामागे चांगली व्यक्ती आहे. मी खूप भाग्यवान आहे की राखीसारखी महिला माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून आली.'
त्यानंतर रितेशला मीडिया समोर कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर योग्य वेळ आल्यावर नक्कीच मीडियासमोर येणार असल्याचे त्याने सांगितले. त्याप्रमाणे काहीदिवसांपूर्वी राखी गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
पण रितेशने या अफवा असल्याचे सांगितले. त्यामुळे आता रखीचा हा भाग्यवान पती कधी मीडियासमोर येणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे