Rakhi Sawant Adil Khan: बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या वैवैहिक आयुष्यातील अडचणी काही केल्या संपत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. याआधी राखी सावंत हिने पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्यावर मारहाण आणि फसवणूकीचे आरोप केले होते. राखीने आदिल विरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर आदीलला पोलिसांनी अटक केली आहे. एवढंच नाही तर, न्याय मिळावा यासाठी राखी हिने न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावले आहेत. त्यानंतर आता राखीने आदिल खानबरोबरचा बेडरूममधील व्हिडीओ शेअर केला आहे. 



राखी सावंतने 'मराठी बिग बॉस 4' मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री केली आणि बाहेर पडताच लोकांना एक मोठा धक्का दिला. राखीने सर्वप्रथम आपल्या आईच्या आजाराविषयी माहिती दिली आणि आणि लोकांना आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. यानंतर राखीने एक मोठा धक्का दिला. राखीने उद्योगपती आदिलसोबतच्या लग्नाचा खुलासा केला. त्यानंतर आदिल खान विरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली. एवढे करून सुद्धा राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामपेजवरुन आदिल खानबरोबरचा बेडरुममधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी व आदिल रोमान्स करताना दिसत आहेत. तसेच आदिल राखीला किस करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत राखीने कॅप्शनमध्ये तुटलेले हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. राखी व आदिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  


वाचा: 'या' अभिनेत्रींच्या एका फोननं अमिताभ बच्चन यांची उडाली होती झोप, नक्की काय घडलं? 


राखी सावंतचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. यामध्ये एकाने कमेंट करत म्हटलं की,  “तुझा ड्रामा आता बघवत नाही. त्यामुळे अनफॉलो करत आहे”, तर दुसऱ्याने “हा व्हिडीओ पोस्ट करण्याचा काय उद्देश आहे” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “राखीला वेड लागलं आहे”, अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे. “याचा अर्थ तू अजूनही आदिलला विसरू शकली नाहीस” असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.