मुंबई : सिद्धार्थ शुक्ल यांचे निधन होऊन आज 5 दिवस झाले आहेत. 2 सप्टेंबर रोजी त्याने या जगाचा निरोप घेतला. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे त्याचे जवळचे आणि चाहतेच अस्वस्थ झाले नाहीत तर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या अकाली निधनामुळे बरेच लोकं तुटली आहेत. त्याचे मित्र आणि चाहते त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी सतत प्रार्थना करत आहेत. सिद्धार्थच्या कुटुंबीयांकडून आणि पोलिसांकडून त्याच्या मृत्यू बाबत कोणतंही विधान समोर आलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखीने सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल केले गंभीर दावे 
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, प्राथमिक तपासाच्या आधारावर, त्याच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं गेलं. पोस्टमार्टम रिपोर्ट राखीव ठेवण्यात आले होते. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमला या प्रकरणी निष्काळजी राहण्याची इच्छा नाही. त्यामुळे सखोल तपासानंतरच निर्णायक निवेदन जारी केलं जाईल. अशा परिस्थितीत, काही लोक चुकत आहेत असा अंदाज लावत आहेत की, कमल रशीद खाननंतर आता राखी सावंतनेही एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंतने धक्कादायक दावा केला आहे. 


राखीने सिंदूर लावून बनवला व्हिडिओ 
राखी सावंतने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूसंदर्भात एक व्हिडिओ बनवला, ज्यात तिने सिंदूर लावलेलं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणाला, 'नमस्कार मित्रांनो, मी अजूनही घरीच आहे, मी कुठेही बाहेर पडू शकत नाही. सिद्धार्थच्या मृत्यूने मी खूप हादरले आहे, पण  मला आत्ताच कळलं की सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला नाही, मग तो कसा गेला. वेगवेगळ्या डॉक्टरांनी साडेतीन तास पोस्टमॉर्टम केले आणि त्यांनी पोस्टमॉर्टम अहवालात म्हटलं की त्याला हृदयविकाराचा झटका आला नाही. तर त्याता मृत्यू कसा झाला? शोधण्यासाठी बर्‍याच गोष्टी तपासासाठी पाठवल्या गेल्या आहेत, मी खूप काळजीत आहे.


राखीचा दावा आहे की, सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला नाही
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर राखी सावंत पुढे म्हणाली, 'त्याच्या बीएमडब्ल्यू कारच्या काचाही तुटल्या होत्या, तो कोणाशी भांडला होता का? असं म्हटलं जातं की, 8 ते 8.30 च्या दरम्यान तो कुणाला भेटायला गेला आणि नंतर घरी आला आणि म्हणाला की, त्याची तब्येत ठीक नाही, मग रात्री तीन वाजता सांगितलं की, माझी तब्येत ठीक नाही. मग त्याने काही औषधं खाल्ली, ती औषध कोणती होती. त्याचं बिल्डिंगमध्ये भांडण झालं होतं. त्याच्या कारच्या काचा फुटल्या होत्या. अरे देवा, सत्य काय आहे? त्याच्या चाहत्यांसमोर, आपल्या समोर आलं पाहिजे. त्याच्यावर काही दबाव होता का ? ज्यामुळे भांडण झालं, त्याने कोणती औषध खाल्ली. हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलं गेलंय हे त्याच्या चाहत्यांना, मला आणि देशातील लोकांना जाणून घ्यायचं आहे. हे ऐकल्यानंतर मला खूप चक्कर येते. जर हा हार्टअटॅक नव्हता तर काय होतं?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राखी सावंतला संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे आहे
हा व्हिडिओ पोस्ट करताना राखी सावंतने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'मित्रांनो, मला धक्का बसला आहे, काय हे लोकं खरं सांगत आहेत का? की, हृदयविकाराचा झटका आला नाही. मला जाणून घ्यायचं आहे कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून कृपया मला सांगा, कृपया मला मृत्यूचं कारण सांगा. '' राखीच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. अनेक चाहते राखीवर विश्वास ठेवत आहेत. तर अनेक जण राखीला ड्रामेबाज म्हणत आहेत. लोक म्हणतात की राखी हे प्रसिद्धीसाठी करत आहे. राखीच्या शब्दावर किती सत्य आहे, याची खात्री केली जावू शकत नाही.