गोरिल्याच्या गेटअपमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचा डान्स, व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आपल्या बिंधास्त स्वभावामुळे कायम लाईम लाईटमध्ये असते. राखीला फक्त ड्रामा क्वीन म्हटलं जात नाही तर ती अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. दरम्यान, राखी सावंतने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
खरं तर, राखी सावंतने तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत गोरिलाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. याच गेटअपसोबत तिने दुपट्टाही परिधान केला आहे. या गोरिला गेटअपमध्ये तिने माधुरी दीक्षितच्या प्रसिद्ध गाण्यावर 'चोली के पीचे क्या है' यावर ठेका धरला. जेव्हा राखी नाचू लागली तेव्हा तुमचही हसून पोटात दुखेल. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मी ही खरी राखी सावंत आहे....
राखी सावंतचा हा लेटेस्ट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. राखी सावंतच्या या गोरिला व्हिडिओवर सेलिब्रिटीही भरपूर कमेंट करत आहेत. राखी सावंतचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. राखी सावंतच्या या मजेदार व्हिडिओवर कमेंट करत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने लिहिलं आहे की, 'लव्ह यू क्वीन'. तर दुसरीकडे, टिव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी कमेंटमध्ये हसू आवरू शकली नाही.
राखी सावंत नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिंधास्त स्टाइलमुळे चर्चेत असते. अभिनेत्री सध्या दुबईत आहे आणि तिथून ती सतत तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. नुकतीच राखी सावंतने बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरी यांचीही भेट घेतली. यावेळी तिने त्यांच्यासोबत डान्सही केला. यावेळचे फोटो आणि व्हिडीओही राखीने इन्स्टावर शेअर केले आहेत.