Rakhi Sawant Demands Z Security: राखी सावंत ही आपल्या विक्षिप्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. तिचे व्हिडीओ हे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल (Rakhi Sawant Viral Video) होत असतात. त्यामुळे तिच्या प्रसिद्धीत दिवसेंदिवस वाढ होताना  दिसते. राखी सावंतचा मेलोड्रामा दिवसेंदिवस अधिकच वाढत जातो आहे. आता पुन्हा एकदा राखींनं नवा मेलोड्रामा काढला आहे ज्याच्यासाठी राखीनं थेट पंतप्रधानांकडे Z Security ची मागणी केली आहे. सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून बिश्नाई टोळीकडून जीवेमारण्याच्या (Salman Khan and Rakhi Sawant) धमक्या येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातून यामध्ये सलमान खानच्या बाजूनं उभी राहत राखीनंही उडी घातली होती. तेव्हा काही दिवसांपुर्वी लॉरेन्स बिश्नाईकडून राखीला थेट धमकी मिळाली होती. तेव्हा आपल्याला यासंदर्भात सुरक्षा हवी असल्याची मागणी राखीनं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे. 


काय म्हणाली राखी? 


राखीनं तिच्या एका वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला आहे. इन्स्टंट बॉलिवूडशी संवाद साधताना तिनं सांगितले की, ''मी लवकरच मोदीजींची भेट घेणार आहे. खरंतर मी हे इतक्याच कोणालाही सांगणार नव्हते. मला झेड सुरक्षा हवी आहे त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. जर ही सुरक्षाव्यवस्था कंगना राणौतला मिळू शकता. तर मला का नाही? कंगनाला तर कसलीच धमकी मिळाली नव्हती मगला तर धमक्यांचे मेल आले आहेत.'' 


राखीचे वक्तव्य चर्चेत! 


काही दिवसांपुर्वी राखीनं माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, ''मी ईदच्या मुहूर्तावर हे सांगून इच्छिते की माझ्या सलमान भावाला कुणीही स्पर्श करू नका. जर माझे प्राण घेऊन तुम्हाला समाधान होणार असेल तर तुम्ही माझा जीव घ्या. एवढंच नाही तर मला मारल्याचा आरोपही तुम्ही तुमच्यावर घेऊ नका''. राखीचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. काही दिवस सलमान खानला बिश्नाई टोळीकडून धमक्या येत आहे. त्यामुळे राखी सावंतही यावर आपलं वक्तव्य मांडले होते. सलमान खानच्या बिग बॉस या रिएलिटी शोमध्ये राखीनं अनेकदा हजेरी लावली होती. त्यामुळे सलमानचं आणि राखीचे वेगळं नातं आहे. त्यातून राखीची आई आजारी असताना सलमान खाननं तिला मदतही केली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राखीचा मेलोड्रामा काही थांबेना 


मध्यंतरी राखी सावंत हिनं मोठा मेलोड्रामा केला होता. राखी आपला बॉयफ्रेंड आदिल खानसोबत (Adil Khan) चर्चेत होती. कधी आपलं लग्न झालंय तर कधी आपलं लग्न झालं नाहीये अशी तळ्यात मळ्यात उडी आदिल घेताना दिसत होता. कधी ते दोघं कोर्टात एकमेकांसह लग्नबंधनात अडकताना दिसले होते तेवढ्यात राखी आपली पत्नी नसल्याचा गोलमाल आदिलनं सुरू केला होता. आता कुठे हे प्रकरण शमलं असलं तोच आता नव्यानं हे प्रकरण सुरू झालं आहे.