मुंबई : बिग बॉस 14 घरातून बाहेर पडल्यानंतरही राखी सावंतची धमाल मस्ती करणं संपलेलं नाही. ती आजही त्याच मूडमध्ये दिसते. राखी सावंतची स्टाईल चाहत्यांना खूप हसवते. आता पुन्हा एकदा ती बिग बॉसच्या घरात पोहोचली होती. घरात जाण्याआधी तिने मीडियाशी संवाद साधला. यावेळी ती स्टायलिश आउटफिटमध्ये दिसली होती. ग्लॅमरस स्टाईलनंतरही तिला उफ् मुव्हमेंटला बळी पडावं लागलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा राखी उफ मुव्हमेंटला बळी पडली
खरंतर राखी सावंत तिच्या लूकमध्ये मीडियासमोरप पोझ देत होती. मग तिने तिचा ड्रेस स्टाईलनुसार उचलला. या दरम्यान, तिचा ड्रेस थोडा जास्त वर झाला. त्यात तिची चूकही कळली नाही, पण कॅमेऱ्यासमोर तिची ही चूक कॅमेऱ्यात कैद झाली. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे आणि त्याला ओप्स मोमेंटचं बळी व्हावं लागलेृं आहे. लोकं राखीच्या या मुव्हमेंटची थट्टा करत आहेत.


राखीची स्टाईल आगळी-वेगळी आहे
तसं, राखी सावंतला याचा काही फरक पडत नाही. तिने फुलऑन फ्लॉन्ट केलं आणि अनेक पोझ दिल्या. अशा परिस्थितीत लोक घाबरून जातात, पण यानंतरही तिच्या शैली आणि आत्मविश्वासात कोणतीही घट झालेली नाही.


राखी सावंतने बिग बॉस ओटीटीच्या घरी जाण्यासाठी हलका ऑरेंज रंगाचा गाऊन घातला होता. तसंच, तिने भारी मेकअपसह हेवी ज्वेलरी घातली होची. याशिवाय तिने बूट आणि शिमरी बेल्टसह लूक पूर्ण केला.



राखी सावंतचं गाणं नुकतंच रिलीज झालं
बिग बॉस 14 घरातून बाहेर आल्यापासून राखी सावंत सतत चर्चेत होती. जेव्हाही ती कुठे दिसली, ती लोकांना मजेदार पद्धतीने खूप हसवते. नुकतंच राखीचं एक नवीन गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. काही दिवसांपूर्वी तिचं एक गाणं देखील प्रदर्शित झालं होतं. 'मेरे ड्रीम में तेरी एंट्री ...', हे गाणं लोकांना खूप आवडलं आहे.