मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. राखी सध्या दुबईतील बिझनसमन आदिल खानसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघं बऱ्याचवेळा एकत्र दिसले आहेत. त्याचबरोबर आदिल राखीवर त्याच प्रेम व्यक्त करताना दिसतो.  नुकतेच त्याने राखीला दुबईमध्ये एक आलिशान अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. आता राखीने तिच्या नवीन घराला भेट दिली आहे. तिच्या घराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 
 
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ राखीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी तिच्या ड्रीमी फ्लॅटची टूर करून दाखवत आहे. किचन एरिया लिव्हिंग रूम ते तिच्या बेडरूमपर्यंत तिनं संपूर्ण घर दाखवलं आहे. राखीच्या बेडरूममध्ये ब्राउन रंगाचं फर्निचर आहे. तिच्या लिव्हिंग रुममध्ये राखाडी रंगाचा सोफा आहे. व्हिडीओत राखी तिच्या बेडवर दिसत आहे. व्हिडीओत राखीनं सांगितलं की हे घर घेण्यासाठी तिनं 7 वर्षांसाठी लोन घेतलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राखीचा हा व्हिडीओ पाहिलात का?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केले असून ती बॉयफ्रेंडच्या पैशावर मज्जा करत असल्याचे म्हटले आहे. तर एका ट्रोल करत म्हणाला,'आदिलकडे एवढं सगळं आहे.  काही दिवसांपूर्वी आदिलनं राखीला एक आलिशान BMW X1 देखील भेट दिली होती. दरम्यान, कालच राखी दुबईहून मुंबईत परतली आहे.