मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सध्या अडचणीत सापडली आहे. राखीने नुकतीच आदिवासींच्या कपड्यांची खिल्ली उडवली आहे. आता या विनोदाने अभिनेत्री मोठ्या अडचणीत सापडली आहे. झारखंडमधील आदिवासींची मुख्य संघटना असलेल्या केंद्रीय सरना समितीने राखीविरोधात रांचीमधील एससी-एसटी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समितीने दाखल केला गुन्हा 
या समितीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 'राखी सावंतने अश्लील पोशाखात स्वत:चा एक व्हिडिओ शूट केला आहे आणि तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करताना त्याचं वर्णन आदिवासी पोशाखात केलं आहे. आदिवासींच्या संस्कृतीला बदनाम करण्याचं हे सुनियोजित षडयंत्र आहे.


केंद्रीय सरना समितीचे अध्यक्ष अजय तिर्की म्हणाले की, 'आदिवासी समाजाची स्वतःची गौरवशाली परंपरा आहे. राखी सावंत बेली डान्ससाठी अश्लील वेश परिधान करून आदिवासी समाजाशी जोडत आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह तर आहेच पण आदिवासी समाजातील लोकांना त्यांच्या या कृत्याने अपमानास्पद वाटत आहे. आम्ही तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाईची विनंती केली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राखी सावंतचा कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही
केंद्रीय सरना समिती याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पत्रही लिहिणार आहे. याप्रश्नी आम्ही केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांचीही भेट घेणार असून, आदिवासी समाजाविरोधातील असा अपप्रचार थांबवण्याची मागणी करणार असल्याचं समितीचे अध्यक्ष अजय तिर्की यांनी सांगितलं. झारखंडचा आदिवासी समाज राखी सावंतचा कोणताही कार्यक्रम राज्यात होऊ देणार नाही. असंही ते म्हणाले.