मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखी सावंत अनेकदा पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद होते. या दरम्यान, अनेकवेळा ती काही मजेदार कृत्य करते आणि काहीवेळा ती काही वादग्रस्त विधान करते. आता अलीकडेच राखी सावंतने सांगितलं आहे की, अज्ञात व्यक्तीने तिच्या इमारतीत प्रवेश केला आणि तिच्या घराचा दरवाजा तोडला. ज्याची तक्रार राखी सावंत पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, अलीकडेच राखी सावंतने सांगितलं आहे की, एक व्यक्ती तिच्या इमारतीत फॅन म्हणून घुसला आणि राखीच्या घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर तिने ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल केली. तत्काळ कारवाई करून ओशिवरा पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि त्याला अटक करण्यात आलं. राखी सावंतने स्वतः पापराझींना याबद्दल सांगितलं आहे.


राखी सावंतचा हा व्हिडिओ विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत सांगत आहे की, 'मी सध्या अत्यंत खराब इमारतीत राहते. कारण नुकतीच मी पोलीस ठाण्यात एका कैद्याला तुरुंगात टाकून आली आहे. कारण त्याने घरी येवून माझा दरवाजा तोडला. त्यामुळे ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी त्याला अटक केली, तो वेडा आहे.



राखी पुढे म्हणाली, 'त्याला अटक करण्यात आलं, तो इमारतीत खाली येतो, फॅन बोलून आत येतो. घरी आल्यावर त्याने दरवाजा तोडला. मी घरी नव्हते, घरी मुलगी घरी होती, ती खूप घाबरली आहे. तिने रडायला सुरुवात केली मुलीला दुखापतही झाली आहे. नंतर खूप ड्रामा झाल्यानंतर मी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. राखीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.