Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या लग्नाच्या वादामुळे कायम चर्चेत असते. राखीने पती आदिल खान दुर्राणी (Adil Khan Durrani) याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली असून, सध्या तो तुरुंगात आहे. दरम्यान, राखी सावंत या प्रकरणात अनेक खुलासे करत आहे. नुकताच तिने आपला गर्भपात झाल्याचे म्हटले आहे. तर, डॉक्टरांनी ताकीद दिल्यानंतर देखील आदिलने न ऐकता सबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आरोप देखील राखीने केला आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये आदिलने राखी सावंतला कोर्टात धमकी दिल्याचे तिने स्वत: खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाचा: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता 


राखीने आदिल खान (Adil Khan Durrani) दुर्राणीवर अनेक आरोप केले आहेत. लग्न झाल्यानंतर देखील आदिलचे अफेयर सुरू असल्याचा दावा राखीने केला. दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी या प्रकरणासंदर्भात सुनावणी होती आणि अंधेरी कोर्टानं तेव्हा आदिलला चार दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली होती. चार दिवसांनंतर २० फेब्रुवारीला आज पुन्हा एकदा कोर्टात आदिलला हजर केलं गेलं. आदिलवर कलम 376 अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. तर राखीच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार पोलिसांजवळ ट्रान्सफर वॉरंट आहे आणि या प्रकरणाची सुनावणी आता 24 फेब्रुवारी रोजी म्हैसूर कोर्टात होणार आहे. त्यामुळे आदिलला म्हैसूर कोर्टात नेलं जाईल अशी शक्यता आहे. 



यादरम्यान आता एक व्हिडीओ व्हायर होत आहे ज्यात राखी आदिलनं आज कोर्टात तिला धमकी दिल्याचं मीडियाला सांगत आहे. राखी सावंतनेस सांगितलं की,''आज मी आदिलला कोर्टात पाहिलं तो मला अॅटिट्युड दाखवत होता. जेलमध्ये मोठ्या डॉन लोकांना भेटलोय...मी बाहेर आलो की विचार कर तुझं काय होईल''. राखीनं सांगितलं की आदिल तिला कोर्टात धमकी देत होता.