Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राखी सावंतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राखी सावंतनं वाढत्या टॉमेटॉच्या दरावरून सगळ्यांची अशीच खिल्ली उडवली आहे. राखी सावंतनं घरीच टॉमेटोची शेती केली आणि त्याच्या रक्षण देखील करणार आहे. राखी सतत चर्चेत राहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसते. राखीनं आता केलेल्या कृत्यानं सगळ्या नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉमेटोचे दर हे कुठे 100 रुपयांच्या पार तर कुठे 160 रुपये इतके झाले आहेत. हे पाहता राखी सावंतनं घरीच टॉमेटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत टॉमेटो लावण्यासाठी राखी कुंडीच्या शेजारी बसल्याचे दिसत आहे. तर खाली बसून राखी कुंडीत टॉमेटो टाकते. राखीनं चक्क 4-5 टॉमेटो त्या कुंडीत घातले आहे. त्याशिवाय राखी त्यावर माती टाकताना दिसते. राखी या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलते की 15 दिवसात टॉमेटो येतील. तर तिच्या जवळ असलेला माळी देखील बोलतो की 15 दिवसात झाडावर टॉमेटो येतील. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यासोबत राखीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओत राखी बोलते की झाडाला इतके टोमॅटो येतील की सात जन्म तिला ते पुरते. राखीचा हा व्हिडीओ पाहून चाहते चाहत्यांना हसू अनावर झालं आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकरी कमेंट करत म्हणाला, "टॉमेटो किती महाग आहेत आणि राखी अशी वाया घालते." दुसरा नेटकरी म्हणाला, "इतके टॉमेटो वाया नका घालू, त्याची फक्त बी लावतात." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ च्या Adult Scene साठी लता दीदींचं गाणं पाहून संतापलेलं मंगेशकर कुटुंब


काही दिवसांपूर्वी राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती स्वत: च्या डोक्यावर अंडे फोडताना दिसते. या व्हिडीओत राखी बोलते की ती एका नवरदेवाचा शोधात आहे... मुलगा भेटला पाहिजे... चांगला मुलगा भेटला पाहिजे ते पण... राखीचं हे वक्तव्य ऐकूण तिथे असलेल्या अनेकांना आश्चर्य झाले. तर अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले. पापाराझी राखीची मस्करी करत होते.