दुबईत राखी सावंतची शेखबरोबर धमाल मस्ती, व्हिडिओ व्हायरल
राखी सावंत तिच्या धमाल शैलीसाठी ओळखली जाते.
मुंबई : राखी सावंत तिच्या धमाल शैलीसाठी ओळखली जाते. या दिवसांमध्ये राखी दुबईला पोहोचली आहे आणि तिथेही जाऊन ती आपल्या धमाल मस्तीमुळे लोकांचं भरपूर मनोरंजन करताना दिसत आहे. नुकतीच अभिनेत्री दुबईच्या शेखसोबत स्पॉट झाली आणि राखीने अशी मागणी केली की, शेख तिथून पळून गेले.
राखीचा व्हिडिओ
बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या फ्री शैलीसाठी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत असते. अलीकडेच तिने तिच्या अशाच एका व्हिडिओने वर्चस्व गाजवलं. दुबईतील एका इव्हेंटमधून राखी सावंतचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका शेखसोबत पोज देताना दिसत आहे. यादरम्यान अचानक राखीने अशी मागणी केली, जी ऐकून शेख आश्चर्यचकित होतो आणि तिथून पळून जाण्यासाठी कोरोनाचे कारण बनवताना दिसत आहे.
राखीचा ड्रेस
खरंतर, नुकतीच राखी सावंत दुबईमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा शेखचा ड्रेसही परिधान केला होता. या ड्रेससोबत, तिने सोनेरी चमकदार शूज आणि तिच्या डोक्यावर एक शानदार मुकुट परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत एक शेखही दिसत आहे. ज्यांच्यासोबत राखी पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये राखी शेखसोबत फोटोसाठी पोझ देत असताना अचानक त्याचा हात धरून गोल्डन व्हिसाची मागणी करताना दिसत आहे. हे ऐकून शेख हादरतो आणि कोरोना असल्याचे भासवून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण राखी त्याचा हात हातात घेऊन गुडघ्यावर बसून त्याच्याकडे गोल्डन व्हिसा मागत राहते. मात्र, हा निव्वळ विनोद असून नंतर ती शेखसोबत फोटो काढताना दिसत आहे.