मुंबई : राखी सावंतला केवळ ड्रामा क्वीन म्हटलं जात नाही. तर ती तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जीवनाला एक ट्विस्ट देऊन चाहत्यांचं मनोरंजन करत असते. सध्या ती तिच्या लव्ह लाईफबद्दल खूप चर्चेत आहे. अलीकडेच राखीने आदिल खान दुर्राणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नात्यात येण्याआधी राखीला खूप मानसिक आघातातून जावं लागलं होतं. खरंतर, राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांचं नातं काही दिवसांपूर्वी तुटलं, त्यानंतर तिला सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला.


नुकताच राखी सावंतने तिच्या मागील लग्नाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. राखीची ही चर्चा ऐकून सगळेच थक्क झाले. एका मुलाखतीदरम्यान एक्स पतीबद्दल बोलताना राखीने सांगितले की, ती त्याला कधीही माफ करू शकणार नाही. यादरम्यान राखीने सांगितलं की, रितेशने त्याच्या आईसोबत जे काही केलं आहे. त्यासाठी ती त्याला कधीही माफ करू शकणार नाही.


राखीने स्वतः खुलासा केला की, तिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा तिने आत्महत्येचा विचार सुरू केला होता. राखीच्या आयुष्यातील या सर्व समस्या रितेशमुळेच जन्माला आल्या.


रितेशवर आरोप करत राखीने सांगितलं की, जेव्हा ती बिग बॉसच्या घरात होती तेव्हा तिच्या एक्स पतीने तिच्या आईला रुग्णालयात एकटं सोडलं होतं. इतकंच नाही तर रितेशने ना राखीच्या आईकडे लक्ष दिले, ना हॉस्पिटलचं बिल भरलें. अशा परिस्थितीत राखीला या सर्व गोष्टींमुळे पूर्ण दु:ख झालं आणि तिने आत्महत्या करण्याचा विचार सुरू केला.


राखी म्हणाली की, आत्महत्या करण्यापूर्वी तिला वाटलं होतं की, मी एक व्हिडिओ बनवेन, ज्यामध्ये मी या सगळ्यासाठी रितेशला जबाबदार धरेल. राखीने असं पाऊल उचललं नाही, हीच चांगली गोष्ट आहे.