मुंबई : राखी सावंत सध्या बॉयफ्रेंड आदिल हुसैन दुर्रानीच्या प्रेमात आहे. ती अनेकदा आदिलसोबत हँग आउट करताना दिसते. राखी सावंत बॉयफ्रेंडबद्दल खुलेपणाने बोलत असते. यासोबतच ती त्याच्यासोबत तिचं फ्युचर प्लानिंगही करत आहे. दरम्यान, बॉलीवूडच्या ड्रामा क्वीनने म्हटलं आहे की, सलमान खानने लवकरच तिच्या मुलांचे मामा व्हावं अशी तिची इच्छा आहे. राखी सावंत गुरुवारी मुंबईत दिसली. यादरम्यान ती बॉयफ्रेंड आदिल हुसैन दुर्रानीबद्दल खूप बोलली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंत सलमान खानला तिचा सर्वात आवडता अभिनेता मानते. यासोबतच ती नेहमीच त्याची स्तुती करत असते. सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'मला एक दिवस सलमानला माझ्या मुलांचं  मामा बनवायचं आहे. सलमान जी तुम्ही काका मामा होणार? अरे ते माझ्या हातात आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


याशिवाय राखी सावंत बॉयफ्रेंड आदिल हुसैन दुर्रानीबद्दलही खूप बोलत आहे. राखी सावंतचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडलाय.  राखी सावंत गेल्या काही काळापासून आदिल हुसैन दुर्रानीला डेट करत आहे. यापूर्वी ती रितेशसोबतच्या लग्नामुळे चर्चेत होती. राखी सावंतचा पतीसोबत बराच वादही झाला होता.