मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. राखीचे व्हिडीओ हे नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. नुकताच राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राखीच्या या डान्स व्हिडीओमध्ये तिच्या बिल्डिंगच्या वॉचमनने तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंतचा हा व्हिडीओ वुम्पला या सेलिब्रिटी फोटोग्राफरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीनं जांभळ्या रंगाचा जीम वेअर परिधान केलं आहे. हा व्हिडीओ तिच्या बिल्डिंगच्या आतला आहे. या व्हिडीओत रणबीर कपूरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शमशेरा या चित्रपटाच्या जी हुजूर गाण्यावर डान्स करताना दिसत  आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राखीने तिचा डान्स थांबवल्याानंतर पापाराझी तिला बॉयफ्रेंड आदिल खानसमोर डान्स करण्याची विनंती करतात. त्यावेळी राखी आदिलसोबत डान्स करायला जाते. त्यानंतर तिच्या बिल्डिंगचा वॉचमेन पुढे येतो आणि सगळ्यांना निघून जाण्यास सांगतो. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


राखी सावंतच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, तिचा डान्स पाहून वॉचमॅननं बाहेर काढलं. दुसरा नेटकरी म्हणाला, ही राखी पागल सारखं काहीही करते. तिसरा नेटकरी म्हणाला, आता फक्त देवचं वाचवू शकतात आदिलला. तर काही नेटकऱ्यांनी राखीच्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.