मुंबई : सोमावरी रात्री ८.३० वाजता विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे फोटो आणि अधिकृत घोषणा झाली.  
विराटच्या खेळाचे जितके दिवाने आहे तितकेच त्याच्या लूक्सच्या अनेकजणी चाह्त्या आहेत. विरूष्काने त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केल्यानंतर अनेक मुलींच्या काळजाचा ठोका चुकला.  


शेअर केला खास व्हिडीओ  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची खबर मिळाल्यानंतर एकीकडे बॉलिवूडकरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर दुसरीकडे राखी सावंतने मात्र तिचं दु:ख व्यक्त केलं.  


इंस्टाग्रामवर व्हिडिओ  


इंस्टाग्रामवर एका फिल्टरचा वापर करून राखी सावंतने विराटने तिचं हृद्य तोडल्याचे दु:ख व्यक्त केलं आहे. 



 


हॅलोविन पार्टीच्या दरम्यान इंस्टाग्रामवर काही भयावह फिल्टर उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एकाचा वापर राखी सावंतने केला आहे. त्यामुळे राखीचा मूळ चेहरा दिसत नाही.  



दिल्लीत होणार रिसेप्शन  


मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये विरूष्का लग्नबंधनात अडकले. इटलीमध्ये विवाहबद्ध झालेल्या विराट आणि अनुष्काने दिल्लीमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवले आहे. येत्या 21 डिसेंबरला विरूष्काचं रिसेप्शन आहे. यामध्ये बॉलिवूडचे स्टार्स आणि क्रिकेटर्स हजेरी लावणार आहेत.