मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत कायम चर्चेत असते. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियीवर देखील कायम सक्रिय असते. ती नेहमी स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:च्या लग्नाची बातमी इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनमध्ये राहणाऱ्या रितेश नावाच्या मुलाशी लग्न केल्याचं खुद्द राखीनं काही महिन्यांपूर्वी जाहीर केलं होतं. तिनं यावेळी तिच्या पतीच्या घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. 


इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'माझे घर, मी माझ्या पतीच्या मनाची राणी आणि माझ्या घराची राणी' असं लिहिलं आहे. राखीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.


'तू असं खोटं का बोलते आहेस? घर आणि हॉटेलची रूम यातील फरक आम्ही सहज ओळखू शकतो' असा टोलाही तिला नेटकऱ्यांनी लगावला आहे.