Rakul Preet Singh : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिचे चित्रपट तर कधी तिचं खासगी आयुष्य... रकुल सध्या एका वेगळ्याच कारणमुक्ते चर्चेत आहे. ते कारण म्हणजे सोशल मीडियावर तिचा व्हायरल होत असलेला व्हिडीओत. आता रकुलनं असं काय केलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर चला जाणून घेऊया नक्की असं काय झालं आहे. खरंतर रकुलनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रकुलनं -15 डिग्री सेल्सियसमध्ये थंड बर्फाच्या पाण्यात डुबकी मारली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रकुलचा हा व्हिडीओ तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रकुलबर्फाळ प्रदेशात क्रायोथेरपी घेत असलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. रकुलचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी बर्फाळ प्रदेशात पाण्याचं एक छोटं डबकं तयार केल्याचे दिसत आहे.  ज्याच्या आसपास काही लोक उभी आहेत. यानंतर, लाकडाच्या केबिनमधून रकुल बिकिनीमध्ये बाहेर येते आणि त्यानंतर ती बर्फाच्या थंड पाण्यात डुबकी मारते. हा व्हिडीओ शेअर करत रकुलनं कॅप्शन दिलं आहे की, 'बाहेर -15 डिग्री सेल्सिअस तापमान आहे.' इतक्या थंडीत रकुल बिन्दास्त पाण्यात डुबकी मारते आणि असे करता तिच्या चेहऱ्यावरची स्माइलही तशीच कायम राहते. मात्र, जेव्हा रकुल तिथून बाहेर येते आणि केबिनकडे पुन्हा परतते तेव्हा ती थंडीनं कुडकुडत असल्याचे दिसते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रकुलचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'रकुलनं पाण्यात आग लावली.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रकुल पाण्यात जाण्याआधी ते खूप गार होतं पण आता जर तपासलं तर ते नक्कीच गरम झालं आहे. हा रकुल हॉट असण्याचा पुरावा आहे.' तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ही कोणत्या चित्रपटाची शुटींग आहे का?' एक नेटकरी म्हणाला, 'आता संपूर्ण ग्लेशियर वितळलं असणार.' 


हेही वाचा : सबालाही समजले हृतिकचीच लेक...; अभिनेत्याचं Relationship ठरलं ट्रोलिंगचा विषय


रकुल प्रीतच्या कामाविषयी बोलायचे झााले तर सगळ्यात शेवटी 'छत्रीवाली' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रकुलनं 'कंडोम' विक्रेत्या एका स्त्रीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी तो प्रेक्षकांचा पसंतीस उतरला होता. रकुलच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर ती अभिनेता जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.