मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग तिच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. रकुलप्रीत ही नेहमीच तिच्या फॅशनने सर्वांना वेड लावत असते. रकुलप्रीत सिंग सोशल मीडियावर सुद्धा खूप एक्टिव्ह आहे आणि तिचे एक एक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ ते बॉलिवूड आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह  (Rakul Preet Singh) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ही अभिनेत्री खूप मेहनती आहे. ती तिची प्रत्येक भूमिका उत्तमरित्या पार पाडते. ती तिच्या भूमिकेसाठी जीव ओतून मेहनत घेते. याचाच एक पुरावा म्हणजे तिने नुकताच शेअर केलेला फोटो.


रकुलसध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या व्यस्त वेळेतही ती आपले अपडेट्स आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. रकुलने शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्रीची तब्येत बिघडलेली दिसत आहे.  सर्वजण तिच्या या फोटोंचे जोरदार कौतुक करत आहेत. 


समोर आलेल्या फोटोवरुन आपण पाहू शकतो की, रकूलने सिनेमाच्या शूटिंगसाठी किती मेहनत घेतली आहे. रकूलने जवळ-जवळ ११ तास पाण्यात तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग केलं. सिनेमातील या शॉटसाठी रकूल खूप उत्साहित आहे.



नुकताच रकूलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या शूटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती टॉवेलमध्ये पूर्णपणे तिचं शरीर गुंडाळलेलं दिसत आहे. याचबरोबर तिला कोणी औषध देताना दिसत आहे. अभिनेत्री तिचे हे फोटो शेअर करताच व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोसोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, आज पाण्यात ११ तास शूटिंग केलं. सगळ्यात कठिण शूटिंग, काढ्याने मला गरम ठेवलं. थँक्यू बाय. रकूलचा हा फोटो पाहून तिचे चाहते तिच्या या कामाच जोरदार कौतूक करत आहेत. 
 
'डॉक्टर जी' या चित्रपटात रकुल फातिमा ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटानंतर तिचा 'थँक गॉड' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2022 मध्ये रकुलचे 'अटॅक', 'रनवे 34', 'कटपुतली' असे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तसेच ती 'इंडियन 2' या बहुचर्चित चित्रपटामध्ये दिसणार आहे.