मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) स्टारर लायगर  (Liger) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटलाय. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप आशा होत्या. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या आशेवर खरा उतरला नाही आणि फ्लॉप ठरला. दरम्यान या चित्रपटाच्या फ्लॉप होण्यामागे आता विजय देवरकोंडाला जबाबदार धरले जात आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकानेही अशी टीका केली आहे.  
  
लायगर (Liger) चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडावर टीका होऊ लागली आहे. बॉलिवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माने विजय देवरकोंडाला चित्रपट फ्लॉप होण्यामागे जबाबदार धरलं आहे. यासोबतच त्यांनी विजयवर निशाणा देखील साधला आहे.


गर्लफ्रेंड नजिलासोबत ब्रेकअपच्या चर्चांवर Munawar Faruqui स्पष्टचं बोलला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकविलाच्या वृत्तानुसार, नुकतच राम गोपाल वर्मा (ram gopal varma) यांनी विजय देवरकोंडाच्या लायगरच्या अपयशावर प्रतिक्रिया दिली आहे.राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे की, 'लाइगर'च्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडाच्या आक्रमक वक्तव्याचा चित्रपटावर नकारात्मक परिणाम झाला. यासह प्रभास, राम चरण, अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर यांसारख्या साऊथ सिनेसृष्टीतील इतर सुपरस्टार्सच्या विपरीत, विजय देवरकोंडा हिंदी प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही. तसेच विजय देवरकोंडाच्या उद्धट वागण्यामुळे लायगर चित्रपटाला प्रेक्षकांनी फारसे प्रेम दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


राम गोपाल वर्मा (ram gopal varma)  यांनी चित्रपटाच्या अपयशाच दुसर कारणही सांगितलं आहे.ते म्हणालेत, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर चित्रपट निर्माता करण जोहरच्या चित्रपटांवर सोशल मीडियावर प्रचंड बहिष्कार टाकण्यात आला होता. तसेच इतर दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणेच विजयच्या आतही नम्रतेचा अभाव आहे. ही काही कारणे आहेत, ज्यामुळे विजय देवरकोंडाचा लायगर यशस्वी होऊ शकला नाही.


समंदर मे नहाके और भीssss; निळ्याशार समुद्रात खुलून आलं Mouni Roy चं सौंदर्य


दरम्यान विजय देवरकोंडाच्या (Vijay Deverakonda) लायगरचे (Liger) ज्याप्रमाणे प्रमोशन झाले होते ते पाहता असे वाटले होते हा चित्रपट सुपर डूपर हिट ठरेलं. मात्र चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडा याने केलेले विधान आणि लायगरच्या कमकुवत कथेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नसल्याची चर्चा आहे.