बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) आणि सलमान खान (Salman Khan) प्रकरणावर पोस्ट शेअर केली असून, देव एक विचित्र विनोद करतोय असं म्हटलं आहे. रामगोपाल वर्मा यांनी एक्सवर एकामागोमाग एक अनेक पोस्ट शेअर करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. सलमान खानने काळविटाची शिकार केली तेव्हा लॉरेन्स बिष्णोई फक्त 5 वर्षांचा होता याकडेही रामगोपाल वर्मा यांनी लक्ष वेधलं.  


रामगोपाल वर्मा यांच्या पोस्टमध्ये काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामगोपाल वर्मा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "1998 मध्ये काळविटाची शिकार झाली तेव्हा लॉरेन्स बिष्णोई फक्त 5 वर्षांचा होता. लॉरेन्स बिष्णोईने 25 वर्ष आपल्या मनात हा द्वेष कायम ठेवला. आता वयाच्या 30 वर्षी त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय आहे ते म्हणजे सलमान खानची हत्या करुन काळविटच्या शिकारीचा बदला घेणं. हे सर्वोच्च स्तरावरील प्राणीप्रेम आहे की, देवाने केलेला एक विचित्र विनोद?".



याआधीच्या पोस्टमध्ये त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर भाष्य करताना जर एखाद्या बॉलिवूड लेखकाने अशी कथा लिहिली असती तर त्याला इतकी वाईट स्क्रिप्ट लिहिल्याबद्दल फटकारतील असं म्हटलं होतं. "गुंड बनलेल्या एका वकीलाला एका सुपरस्टारला मारून काळविटाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे आणि चेतावणी म्हणून फेसबुकवरुन भऱती केलेल्या त्याच्या 700 जणांच्या टोळीला एका मोठ्या नेत्याची हत्या करण्यास सांगतात, जो त्या स्टारचा जवळचा मित्र आहे. पोलीस त्याला पकडू शकत नाहीत कारण तो जेलमध्ये सरकारच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचा प्रवक्ता परदेशातून बोलतोय. जर एखाद्या बॉलीवूड लेखकाने अशी कथा आणली तर ते त्याला सर्वात अविश्वसनीय आणि हास्यास्पद कथा लिहिल्याबद्दल फटकारतील," असं रामगोपाल वर्मा म्हणाले होते. 



1998 मध्ये सूरज बडजात्या यांच्या 'हम साथ-साथ है'च्या चित्रीकरणादरम्यान 1998 मध्ये काळवीट शिकार प्रकरण घडलं होतं. सलमान खान या चित्रपटात होता. तेव्हा लॉरेन्स बिश्नोई उर्फ ​​बलकरन बरार पाच वर्षांचा होता. काळविटाच्या शिकारीनंतर बिष्णोई समाज संतापला होता. 


26 वर्षांनंतर तुरुंगात असतानाही लॉरेन्सचा सलमानविरोधातील संताप सतत चर्चेत असतो. विशेषत: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि बॉलिवूड अभिनेत्याच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची तिघांनी गोळी झाडून हत्या केल्यानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. 


जो कोणी सलमान खान आणि दाऊद इब्राहिम टोळीला मदत करेल त्यांचा हिशोब ठेवा अशी कथित फेसबुक पोस्ट समोर आल्यानंतर बिष्णोईच्या सांगण्यावरून सिद्दीकींची हत्या झाल्याचा मुंबई पोलिसांना संशय आहे. या पोस्ट शुभम लोणकर याने पोस्ट केल्या होत्या, हा बिष्णोई टोळीचा साथीदार शुभम रामेश्वर लोणकर असल्याचा पोलिसांना संशय आहे.