मंदाकिनी लवकरच करणार कमबॅक, बोल्ड सीन ते दाऊदबरोबरच्या संबंधामुळे आल्या होत्या चर्चेत
मंदाकिनी यांनी 1985मध्ये राज कपूर यांचा सुपरहिट सिनेमा `राम तेरी गंगा मैली` या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
मुंबई : बॉलिवूडमध्ये काही कलाकारांची एन्ट्री धमाकेदार आहे. मात्र ती एंन्ट्री फार काळ टिकतेच असं नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. मंदाकिनी यांनी 1985मध्ये राज कपूर यांच्या सुपरहिट सिनेमा 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर मंदाकिनी यांचं भरपूर चाहते होते पण त्यांचं हे यशस्वी करिअर फार काळ टिकू शकलं नाही. मात्र आता मंदाकिनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
मंदाकिनी आहेत 2 दशकांपासून बेपत्ता
'राम तेरी गंगा मैली' मधून दमदार पदार्पण केल्यानंतर मंदाकिनी काही चित्रपटांमध्ये दिसल्या पण नंतर अचानक बॉलिवूडमधून त्या गायब झाल्या. मंदाकिनी यांनी त्यांच्या कारकीर्दीत 48 चित्रपटांत काम केलं. 2002 मध्ये रिलीज झालेला 'से अमार प्रेम' हा बंगाली चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. हिंदी, बंगाली व्यतिरिक्त मंदाकिनी यांनी काही तेलगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
मंदाकिनी बोल्ड सीनमुळे आल्या होत्या चर्चेत
मंदाकिनी यांनी डेब्यू फिल्म 'राम तेरी गंगा मैली'मध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. या चित्रपटातील एका गाण्यात पांढऱ्या साडीमध्ये धबधब्याखाली एक सीन शूट करण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांची पांढरी साडी पूर्णपणे पारदर्शक होती. आजही त्या सीनची जोरदार चर्चा आहे. याशिवाय बाळाला मंदाकिनी यांनी दूध पाजण्याचा एक सीन देखील दिला होता. त्यावेळी मंदाकिनीच्या या सीनमुळे सगळीकडे खळबळ उडवून दिली.
मंदाकिनी यांचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं. खरंतर मंदाकिनी यांचे काही फोटो मीडियासमोर आले होते. ज्यात त्या दाऊद इब्राहिमसोबत बसलेल्या दिसत होत्या. असं म्हणतात की, दाऊदला मंदाकिनी यांच्या सौंदर्याने वेड लावलं होतं. पण हे नातं काही फारकाळ टिकू शकलं नाही. मंदाकिनी यांनी 1990 मध्ये माजी बौद्ध भिक्षू डॉ कागयूर टी रिन्पोचे ठाकूरशी लग्न केलं.
मंदाकिनी करत आहेत बॉलिवूडमध्ये परतण्याची तयारी
मंदाकिनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतण्याच्या तयारीत आहे. एका वृत्तानुसार मंदाकिनीचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी सांगितलं की, त्या सध्या काही स्क्रिप्ट वाचत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, त्या वेब सीरिजमध्ये काम करण्यासही ईच्छूक आहेत. मात्र त्यांना मोठी भूमिका हवी आहे.
या अहवालात असंही सांगितलं गेलंय की, मंदाकिनी पुन्हा अभिनयामध्ये परत येऊ इच्छित नव्हत्या. त्यांचा भाऊ भानूनेच त्यांना परत बॉलिवूडमध्ये पुनराआगमन करण्याची विनंती केली आहे. भानु म्हणाले, 'जेव्हा त्या कोलकाता येथील दुर्गा पूजा मंडळात गेल्या होत्या तेव्हा त्यांचं तिथे प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असल्याचे दिसलं. म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करावं अशी विनंती केली आहे.
मंदाकिनी यांचं अजूनही फॅन फॉलोइंग आहे, पण मंदाकिनी बर्याच काळापासून माध्यमांपासूनही दूर होत्या. यावर मंदाकिनी यांचे मॅनेजर बाबूभाई म्हणाले की, मंदाकिनी सध्या त्यांच्या कमबॅक प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहेत. एकदा ते फायनल झाले की, त्या लवकरच मीडियासमोर येतील आणि कमबॅकची घोषणा करतील.