Chocolate Hero पेक्षा कमी नाही `हा` अभिनेता; तरूणवयातील फोटो पाहून सलमान, शाहरूखही पडतील फिके
Ramayan Actor Sunil Lahri: `रामायण` या मालिकेतील (Ramayan Serial Cast) सर्वच पात्र ही प्रचंड गाजली परंतु त्यातूनही सर्वात लोकप्रिय ठरली ती म्हणजे सीता, राम आणि लक्ष्मण यांच्या भुमिका. लक्ष्मणची भुमिका साकारणारे सुनील लहरी (Sunil Lahri as Laxman) हे अभिनयक्षेत्रातपासून दूर असले तरी त्यांच्या जवानीतले फोटो (Sunil Lahri Young) पाहिलेत तर तुम्हीही त्यांना चॉकलेट बॉय संबोधल्याशिवाय राहणार नाही.
Ramayan Actor Sunil Lihari: 'रामायण' या मालिकेतील सर्वच पात्र ही प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. आजही ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तुम्हाला लक्ष्मण हे पात्र साकारणाऱ्या सुनील लहरी (Sunil Lahri) यांच्याबद्दल माहिती आहे का? त्यांचे जुने फोटो पाहिलेत तर तुम्हीही त्यांना चॉकलेट बॉय संबोधल्याशिवाय राहणार नाही. त्यांनीही फक्त रामायणच नाही तर अनेक मालिकांमधून भुमिका केल्या आहेत. त्यांनी चित्रपटातूनही वेगळ्या आणि रोमॅण्टिक भुमिका साकारल्या आहेत. खुद्द रामायणातील सीताची भुमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांच्यासोबतही त्यांनी रोमॅण्टिक भुमिका साकारल्या आहेत.
'रामायण' या मालिकेतून लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यातील युद्ध दाखवण्यात आले होते ज्यानं अक्षरक्ष: वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. तो एपिसोड आजच्या दिवशी म्हणजेच 16 एप्रिलला प्रदर्शित झाला होता असे मीडिया रिपोर्ट्समधून कळते. तेव्हा या एपिसोडनंतर प्रेक्षक अक्षरक्ष: त्यांच्या अभिनयावर फिदा झाले होते. मेघनादची भुमिका अभिनेते विजय अरोरा (Vijay Arora) यांनी साकारली होती. आज मात्र विजय अरोरा हे आज या जगात नाहीत. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांतून कामं केलेली आहेत. 'यादों की बारात' या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्यांनी एक महत्त्वपुर्ण भुमिका साकारली होती ज्यात त्यांच्यासोबत जीनत अमानही होत्या. त्यांच्या केमेस्ट्रीची तेव्हा बरीच चर्चा रंगली होती. (ramayan actor sunil lahri what is he doing now entertainment news in marathi)
चॉकलेट हिरोपेक्षा कमी नाही रामायणातील लक्ष्मण
मध्यंतरी जेव्हा लॉकडाऊनमध्ये रामायण ही मालिका पुन:प्रक्षेपित करण्यात आली होती तेव्हा रामायण मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भुमिका साकारणारे अरूण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लिहरी यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर त्यांचे फॉलोवर्सही वाढू लागले होते. सर्वाधिक लक्ष वेधले ते म्हणजे सुनील लिहरी यांच्या इन्टाग्राम अकांऊटनं. त्यांचे जुने तरूणपणातील फोटो पाहून सगळेच अवाक झाले. सलमान खान, शाहरूख खानपेक्षाही सुनील अधिक हॅण्डसम दिसतात अशा प्रतिक्रियाही त्यांना येऊ लागल्या होत्या.
हेही वाचा - 'इतक्या' कोटींसाठी Ayan Mukerji ला मिळाली 'War 2' ची ऑफर... Karan Johar चा पापड मोडला?
काय करतात सुनील लहरी?
सुनील लहरी यांनी 1980 साली 'द नक्सलाईट्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर 'फिर आई बरसात', 'बहारों की मंजिल', 'जनम कुंडली' अशा चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. रामायण या मालिकेसोबतच 'विक्रम और बेताल', 'लव कुश', 'परमवीर चक्र' अशा मालिकांमधूनही कामं केली आहेत. त्यांनी त्यानंतर अभिनयक्षेत्र सोडलं होतं. परंतु आता ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. तीन वर्षांपुर्वी ते कपिल शर्माच्या शोमध्ये अरूण गोविल आणि दीपिका चिखलिया यांच्यासमवेत हजर होते जेव्हा त्यांनी फॅन्सशी खूप गप्पा मारल्या. असं कळतं की, रामायणातील सीता म्हणजे दीपिका चिखलियासोबतही त्यांनी एका सिरियलमध्ये रोमॅण्टिक भुमिका केली होती.