मुंबई : सिल्वेस्टर स्टॅलोनने नुकतंच घटस्फोटाच्या वृत्तावर मौन सोडलं आहे. सिल्वेस्टर स्टॅलोनची पत्नी जेनिफर फ्लेविनने लग्नाच्या 25 वर्षांनंतर पतीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं वृत्त येत आहे. त्याच्या पत्नीने मॅगझिनला दिलेल्या पत्रात याची पुष्टी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिल्वेस्टरची पत्नी म्हणाली होती की, "माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. आम्ही या वैयक्तिक मुद्द्यांवर मैत्रीपूर्ण आणि खाजगीरित्या निराकरण करत आहोत." त्याच्या पुष्टीनंतर, या कपलचा घटस्फोट होण्यामागील कारणांबद्दल अनेक तर्क वर्तवले जात होते. यापैकी एक म्हणजे स्टॅलोन आणि फ्लेव्हिन यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यावर झालेल्या वादानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. असं नोंदवलं गेलं की त्यांनी ड्वाइट नावाच्या नवीन रॉटविलरसाठी लढा दिला. ज्याला स्टॅलोन "संरक्षण" म्हणून ठेवू इच्छित होता. तर फ्लेव्हिनला घरात दुसरे पाळीव प्राणी नको होते.



आता हे सर्व दावे ऐकून, स्टॅलोन गप्प बसू शकला नाही आणि त्याने टीएमझेडला निवेदनात म्हटलं आहे की, एवढ्या फाल्तू वादावर आम्ही नातं संपवलं नाही. त्याने कबूल केलं आणि सांगितलं की, "कुत्र्याची काळजी कशी घ्यावी" यावर असहमत आहोत कारण ते वारंवार प्रवास करतात आणि दोन स्वतंत्र घरांमध्ये राहतात. "मला जेनिफरबद्दल सर्वात जास्त आदर आहे," तो पुढे म्हणाला, "मी तिच्यावर नेहमीच प्रेम करेन. ती एक अद्भुत स्त्री आहे. ती मला भेटलेली सर्वोत्तम व्यक्ती आहे.''