मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी जितके प्रसिद्ध असतात तितकेच चर्चेत स्टारकिड्स असतात. मग ती शाहरुखची लेक असो, की मग अजय देवगणची लेक असो. प्रत्येक स्टारकिड्स नेमहीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.  सध्या एक अशीच स्टारकिड्स खूप चर्चेत आहे. जी दुसरी तिसरी कोणी नसून शाहरुखची लेक सुहाना खान आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लेक सुहाना खान आता अभिनेत्री आहे.  नेहमीत ती तिच्या लूक आणि स्टाईलने चाहत्यांना वेड लावत असते. मात्र यावेळी तिचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे. जाणून सुहानाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेमकं असं काय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहानाने बाथटबमध्ये दाखवला ग्लॅमरस अंदाज
खरंतर सुहाना खानने बाथटबमध्ये एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये सुहानाने तिच्या बॉडीला साबण लावत कॅमेरासमोर बोल्ड पोज दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये सुहाना लाइट मेकअप आणि केसांचा बन घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या व्हिडीओतील तिच्या अदा पाहून तिचे चाहते हैराण होत आहेत. तर काही युजर्स तिचा अवतार पाहून तिला ट्रोल करत आहेत.  


युजर्सने सुहानाच्या व्हिडीओवर केल्या अश्या कमेंट्स
सुहाना खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर काही युजर्स सुहानाला ट्रोल करत कमेंट्स करत आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहीलं की, 'रमजान आहे काहीतरी लाज बाळग' तर अजून एकाने लिहीलंय, ''रमजानमध्ये हे सगळं चांगलं नव्हे.'' तर बरेचजण सुहानाचा हा लूक पाहून तिचं कौतुकही करत आहेत. 



अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सुहाना खान या अख्तरचा सिनेमा 'द आर्चीज'मध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिच्यासोबत अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर दिसले होते. त्याचबरोबर सुहानाने शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट'मध्येही काम केलं आहे. सध्या अशीही चर्चा आहे की, लवकरच सुहाना मोठ्या पडद्यावर डेब्यू करताना दिसणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सुहाना खानचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. जिथे अभिनेत्री प्रत्येक दिवशी तिचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.