`शिवगामी देवी` एका सिनेमासाठी आकारते एवढे मानधन
एवढे मानधन
मुंबई : साऊथ सिनेमाचा सुपरहिट सिनेमा 'बाहुबली'. या सिनेमात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांना आज जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. हा सिनेमा हिट झाल्यानंतर या सिनेमांत काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांच्या मानधनात वाढ झाली आहे. यामध्ये अभिनेत्री राम्या कृष्णनचा देखील समावेश आहे. राम्याने 'बाहुबली 1' 'बाहुबली 2' या दोन्ही सिनेमांत अगदी महत्वाची भूमिका साकारली आहे. 'शिवगामी देवी'च्या रुपात दिसलेल्या राम्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केलं आहे.
इतके मानधन आकारते राम्या
साऊथच्या टॉप अभिनेत्रीमध्ये राम्याचा समावेश झाला आहे. राम्या आता अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि राकुल प्रीतपेक्षा अधिक मानधन आकारत आहे. एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, राम्या आता तेलुगु सिनेमा 'सैलाजा रेड्डी अल्लुदु' यामध्ये काम करत आहे. महत्वाचं म्हणजे एका दिवसाच्या शुटिंगचे ती 6 लाख रुपये मानधन घेत आहे. या सिनेमाकरता ती 25 दिवस शुटिंग करत असून 25 दिवसांचे 1.50 करोड रुपये आकारणार आहे. आतापर्यंत साऊथ अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक चार्ज राम्या आकारत असल्याचं म्हटलं जातं आहे.
एवढे सिनेमे केले साईन
साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटिया आतापर्यंत सिनेमांकरता 65 लाख रुपये आकारत आहे. तर अभिनेत्री राकुल प्रीत एका सिनेमांकरता 1 करोड रुपये मानधन घेते. मात्र राम्या जास्त मानधन आकारत असून तिच्याकडे आता 'सैलाजा रेड्डी अल्लुदु' सोबतच 'सुपर डीलक्स' आणि 'पार्टी' सारखे सिनेमे आहेत.