मुंबई : एक दुर्भाग्य असं आहे, जेव्हा सर्व शक्ती एका अशुभच्या हाती लागल्या. असं झलं भगवान राम यांच्या काळात. त्यामुळे शक्ती चांगल्या लोकांच्या हाती असणं यातचं सर्वांचं कल्याण आहे. सांगायचं झालं तर आपल्यावर कोणतही संकट आलं तर आपण देवाकडे प्रार्थना करतो. अशात जगाला वाचवण्यासाठी 'रामयुग' आलं. आता पुन्हा  'रामयुग' (Ramyug) या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना रामायण अनुभवता येणार आहे. पण रामकथा तिचं असली तरी कथा वेगळ्या अंदाजात दाखवण्याचा प्रयत्न सीरिजच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दिग्दर्शक कुणाल कोहली यांच्यानुसार, 'रामकथा संस्कृत आणि प्रादेशिक अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिण्यात आली आहे. ही कहाणी तरुण प्रेक्षकांसमोर अनोख्या पद्धतीने मांडण्यात सक्षम झाल्याचा मला अभिमान वाटतो.' सीरिज 6 मे रोजी  एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे. 


'रामयुग'  सीरिजमध्ये दिगंथ मनचले, अक्षय डोगरा, ऐश्वर्या ओझा, कबीर दूहन सिंह, विवान भटेना, नवदीप पल्लापोलू, अनीश जॉन कोकेन, शिशिर मोहन शर्मा, जतिन सियाल, श्वेता गुलाटी, सुपर्णा मारवाह, ममता वर्मा, टिस्का चोप्रा, दलीप ताहिल आणि अनूप सोनी  मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.