...जेव्हा अचानक रात्री रणबीर आलियाला भेटायला जातो!
बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. कार्यक्रमात किंवा डिनर डेटला रालिया (रणबीर-आलिया) यांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता या चर्चांना अधिक उधाण येणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. शुक्रवारी रात्री रणबीर कपूर रात्री आलिया भट्टच्या घरी पोहचला. असे पडले 'रालिया' हे नाव...
रणबीर कपूर सध्या संजूचे यश एन्जॉय करत आहे. या यशाच्या आनंदात आलियाच्या घरी पोहचलेला रणबीर, आलियाचे वडील महेश भट्ट यांच्यासोबत बातचीत करताना दिसत आहे. फोटोत आलिया आणि रणबीर खिडकीत बसून गप्पा करताना दिसत आहेत. हे फोटोज सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
अलिकडेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने सांगितले की, तो सिंगल नाहीये आणि कधीच सिंगल नसेल. पण आलिया भट्टला डेट करत असल्याचे विचारताच त्याने थेट उत्तर न देता, मी या प्रश्नाचे उत्तर देण्यास राजी नसल्याचे म्हटले आहे.
संजू सिनेमातील रणबीरच्या अभिनयाचे तोंडभरुन कौतूक होत आहे. अलिकडेच या सिनेमाने २०० कोटींची जबरदस्त कमाई केली आहे.
रणबीर आलियाच्या नात्याची चर्चा होत असली तरी दोघांनीही याबद्दल स्पष्टपणे बोलणे टाळले आहे.
आता ही जोडी ब्रह्मास्त्र सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ब्रह्मास्त्र सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. यात अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका आहे.