Ranbir- Alia Wedding :  तिथं रणबीर आलियाचे लग्नविधी रंगात आलेले असतानाच इथं त्यांच्या या नात्याची सुरुवात करण्यासाठी अनेकजण आपलं योगदान देताना दिसत आहेत. या गोड गोंडस जोडीसाठी प्रत्येकजण काहीतरी खास करण्याच्या तयारीत आहे. यातच एका सेलिब्रिटीच्या नावाचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेलिब्रिटीनं आलिया आणि रणबीरच्या मेहंदी सोहळ्याला हजेरी लावल्याचं म्हटलं जात आहे. जिथं त्यानं आपली गाजलेली गाणी सादर केली. 


तुम जब पास होती हो... , कसूर, तुने कहां मैने सुन लिया.... अशी एक ना अनेक गाणी प्रतिकनं यावेळी सादर केल्याचं म्हटलं गेलं. (Prateek kuhad songs)


सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर आणि आलियाचे लग्नविधी होणाऱ्या ठिकाणी प्रतिकाल पाहिलं गेलं होतं. ज्यामुळं तो या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आल्याच्या शक्यता आणखी गडद झाल्या. 


दरम्यान, प्रतीकनं यासंदर्भातील कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण, त्यानं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका रुमचा फोटो शेअर केला. मेहंदी सोहळ्यासाठी निवडलेल्या ठिकाणचाच हा फोटो असल्याचं म्हटलं गेलं. 



अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीचा गायक आलिया आणि रणबीरसाठी गातो, याहून मोठी गोष्ट ती काय ?