मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं आहे. आता या लग्नाचे इनसाईड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लग्नाचे आणि सगळ्या विधींचे फोटो आणि व्हिडिओ क्षणोक्षणी समोर येत आहेत. ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोंमध्ये भट्ट आणि कपूर कुटुंबासोबतच रणबीर आलियाचे फ्रेंड्सही सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसत असले तरी प्रत्येकजण या फोटोंमध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला खूप मिस करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका-कतरिना गायब
१४ एप्रिल रोजी लग्नानंतर नवविवाहित कपलने शनिवारी रात्री 'वास्तू'मध्येच रिसेप्शन पार्टीचं आयोजन केल होतं. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे सगळे स्टार्स दिसले पण आलिया भट्टच्या खास मैत्रिणी दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ अनुपस्थित होत्या. अशा स्थितीत त्यांचा सहभाग नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.


मुंबईत नव्हती दीपिका पदुकोण 
रणबीर-आलियाने त्यांचं लग्न अत्यंत गुप्त ठेवलं होतं. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. दुसरीकडे, रिसेप्शन पार्टीतही पाहुण्यांची यादी मर्यादित ठेवण्यात आली होती. रिसेप्शनबद्दल बोलायचं झालं तर दीपिका नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे आणि रिसेप्शनच्या वेळी कामाच्या बांधिलकीमुळे ती मुंबईत नव्हती, त्यामुळे ती उपस्थित राहू शकली नाही.


आलिया कतरिना आणि दीपिका या दोघींची खूप चांगली मैत्रीण आहे.अवॉर्ड इव्हेंट्सपासून ते रिएलिटी टॉक शोपर्यंत यांनी एकत्र सहभाग घेतला आहे. यासोबतच गंमतीची गोष्ट म्हणजे कतरिना आणि दीपिका या दोघीही रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड आहेत. रणबीर कपूर आधी दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. तर दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याने कतरिनाला डेट करायला सुरुवात केली, पण कपूर घराण्याची सून बनणं हे आलियाच्या नशिबी होतं.