Ranbir Kapoor: रामाच्या भूमिकेसाठी रणबीरची खास फिटनेस ट्रेनिंग, पाहा VIDEO
Ranbir Kapoor fitness training : अभिनेता रणबीर कपूरचा नवा सिनेमा रामायण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रामाच्या भूमिकेसाठी तो खूपच मेहनत घेत आहे. नुकताच रणबीरचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Ranbir Kapoor fitness training : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी सिनेमासाठी मेहनत घेत आहे. त्याचा रामायण सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या सिनेमाचं शुटींग सुरु होणार असून प्रभू रामांच्या भुमिकेसाठी त्याने वर्कआउट सुरु केला असून त्याचा हा व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. रामायण सिनेमात रणबीर मुख्य भुमिकेत असून साउथची क्वीन साई पल्लवी ही सितेच्या भुमिकेत झळकणार असल्याचं सांगितलं जातं.
रामायण सिनेमातील रामाच्या मुख्य भुमिकेसाठी रणबीर त्याच्या शरीरावर खूप मेहनत घेत आहे. एका कलाकाराला भूमिका निभावण्यासाठी शारीरिक मेहनत ही तितकीच घ्यावी लागते. त्याच्या फिटनेस कोचने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओत रणबीर रनिंग, लिफ्टिंग से लेकर स्विमिंग करताना दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बॅक जंप ते सायकलींग करताना दिसत आहे. रणबीर त्याच्या या नव्या सिनेमाकरीता तो वजन वाढवत आहे.
या व्हिडीओत त्याची मुलगी राहा सुद्धा दिसत आहे. त्याच्या या फिटनेस ट्रेनिंगसाठी आलिया आणि त्याची मुलगी राहा त्याला मदत करत आहेत. त्याच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कमेंटकरत त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आतापर्य़ंतच्या कारकिर्दीत चॉकलेट बॉय म्हणून रणबीर ओळखला जातो. मात्र रामायणातील त्याची भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भुमिकांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे त्याचा हा नवा लुक पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले असून हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
छिछोरे, भुतनाथ रीटर्नस्, दंगल या सिनेमांना मिळालेल्या यशानंतर आता दिग्दर्शक नितेश तिवारी हे रामायण हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या सिनेमासाठी भव्य दिव्य सेट आणि रामायणातील प्रसंग जिवंत करण्यासाठी चांगल्या दर्जाचे वापरण्यात येणारे VFX या करीता 11 कोटींचा खर्च केल्याच्या चर्चा रंगत आहेत. रणबीर आणि साउथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या सिनेमासाठी रणबीरने 75 कोटी मानधन घेतल्याचं म्हटलं जातं. अॅनिमल सिनेमाला मिळालेल्या यशानंतर रणबीरच्या या आगामी सिनेमातील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.