Honeymoon जमला नाही, म्हणून थेट Babymoon ला गेले आलिया- रणबीर
फोटो पाहून म्हणाल किती Cute..
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या जीवनातील सर्वात सुंदर क्षणांचा अनुभव घेत आहेत. आलिया-रणबीर त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच आलियाने बेबीमून करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्टार कपलने इटलीमध्ये बेबीमीन साजरा केला. रविवारी दोघे भारतात परतले. सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बेबीमुन सेलिब्रिट करून भारतात परताना दोघांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलिया दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. यादरम्यान रणबीर कपूर क्षणोक्षणी आलिया भट्टची काळजी घेताना दिसला. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एवढंच नाही तर, आलियाने देखील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये फक्त रणबीर दिसत आहे. रणबीरचा व्हिडीओ पोस्ट करत आलियाने कॅप्शनमध्ये, 'the light of my life' अलं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओ अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल रोजी लग्न केलं. पण व्यस्त वेळापत्रकामुळे देघांना हनिमूनला जाता आलं नाही. त्यांनंतर काही दिवसांनी आलियाने आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. आता भट्ट आणि कपूर कुटुंब नव्या पाहुण्याच्या प्रतीक्षेत आहेत.