रणबीर कपूर आणि आलिया भट्टने परिवारासोबत `या` ठिकाणी साजरा केला नववर्षाचा उत्सव
बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नवीन वर्ष 2025 च्या सेलिब्रेशनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये त्यांचे कुटुंबीयही एकत्र होते. ज्यामुळे त्यांच्या नेटकऱ्यांना आनंदाने भरलेले अनेक गोड क्षण दिसले आहेत.
alia bhatt and ranbir kapoor holidays: रणबीर कपूरने नवीन वर्ष 2025 थायलंडमध्ये पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहा कपूरसोबत साजरी केला. यावेळी त्यांचे कपूर कुटुंब एकत्र आले होते. पण या थायलंड टूरमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले नाहीत. रणबीरची बहीण रिद्धिमा साहनी तिच्या कुटुंबासोबत उपस्थित होती. तसेच आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टही त्यांच्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसली.
रिद्धिमा साहनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक कौटुंबिक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती थायलंडमध्ये कुटुंबासोबत आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात करत असल्याचे सांगत आहे. 'एकत्र केलेल्या आठवणी आयुष्यभर टिकतात' असे तिने कॅप्शन दिले आहे. तिने या पोस्टमध्ये 'फॅमिली हॉलिडे', 'न्यू ईयर 2025' आणि 'थायलंड डायरीज' असे हॅशटॅग वापरले.
रिद्धिमाने पती भरत सोबतचा एक फोटोही पोस्ट केला, ज्यामध्ये दोघे टायटॅनिक फिल्ममधील प्रसिद्ध पोज देताना दिसत आहेत. तिने त्याला 'अनिवार्य पोझ' असा कॅप्शन दिला आहे. याशिवाय, आणखी एका फोटोमध्ये रिद्धिमा तिच्या आई नीतूसोबतही टायटॅनिक पोजची नक्कल करताना दिसली आहे. या थायलंड टूरमध्ये कपूर कुटुंब आनंदी आणि मजेशीर क्षण अनुभवत होते.
कपूर कुटुंबाच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर पत्नी आलिया भट्टला 12 वाजता मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसाठी एक गोड आणि रोमँटिक क्षण ठरला आहे. याच व्हिडीओमध्ये आलिया आणि रणबीरने कुटुंबीयांना देखील शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला खूप आनंद व्यक्त केला.
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/what-happened-to-sajid-khan-that-made-him-decide-to-end-his-life-expressed-his-pain-after-6-years/874283
कपूर कुटुंबाची थायलंडमधील सुट्टी आणि त्यांचे नववर्षाचे सेलिब्रेशन बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं आकर्षण ठरले आहे. त्यांच्या चाहत्यांनी यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी त्या परिवारातील नातेसंबंधांबद्दल देखील सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.
कपूर कुटुंबाच्या थायलंडमधील नवीन वर्षाचे सेलिब्रेशन एक रोमांचक, प्रेमळ आणि गोड अनुभव ठरला आहे. जो त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंद आहे.