रणबीर कपूर आणि आलिया भट्ट डिनर डेटवर
पाहा हे फोटो
मुंबई : आलिया भट्ट आणि डिंपल कपाडिया बुल्गारियातून आपला आगामी सिनेमा 'ब्रम्हास्त्र' ची शुटिंग संपवून परतल्या आहेत. मात्र त्या अगोदर आलियाने बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत बुल्गारियामध्ये डिनर डेटला जाण पसंत केलं आहे. रणबीर कपूर आणि आलियाचं अफेअर कुणापासूनच लपलेलं नाही. या दोघांचा एकमेकांसोबतचा फोटो समोर आला आणि हे स्पष्ट झालं की दोघेही एकमेकांसोबत खूप खूष आहेत. हा फोटो ब्रम्हास्त्रच्या क्रू मेंबर्ससोबतचा आहे. ज्यामध्ये आलिया - रणबीर देखील दिसत आहे.
या फोटोत रणबीरने आलियाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. यावरून कळतंय की त्याने आलियाला आपलं मानलं आहे. दोघं ही एकमेकांसोबत खूप चांगला टाईम स्पेंड करत असल्याचं दिसत आहे
बुल्गरियामध्ये आलिया आणि रणबीरने एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला आहे. शूटमधून वेळ काढून हे दोघं एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. या दोघांनी इथे खूप चांगला वेळ घालवला. आलियाने स्वतः शुटिंग दरम्यानचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आणि या सगळ्या फोटोत आपल्याला रणबीर दिसत आहे.