मुंबई : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघं रात्री १ वाजेपर्यंत पार्टी अटेंड करताना दिसले. ही पार्टी कुणा दुसऱ्याची नाही तर रणबीर कपूरच्या मोठ्या पप्पांची म्हणजे रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांच्या वाढदिवसाची. सोशल मीडियावर आता या दोघांना खूप ट्रोल केलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता रणधीर कपूर यांचा आज ७४ वा वाढदिवस आहे. यावेळी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पूर्ण कुटुंबीय एकत्र जमले होते. जेथे रणबीर आणि आलिया देखील पोहोचले. लोकं सतत या मुद्यावरून आलिया-रणबीरला ट्रोल करत आहेत. 


राजीव कपूर यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच कपूर कुटुंबिय पार्टी करत आहेत. ही गोष्ट चाहत्यांना रुचलेली नाही. एवढ्या लवकर सगळं विसरलात? किमान 12 दिवस तरी थांबायचं. 



एका यूजरने, ‘धक्कादायक, राजीव कपूर यांच्या निधनाला एक आठवडाही झाला नाही आणि हे लोकं पार्टी एन्जॉय करतायेत’ असे कमेंट करत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने किती स्वार्थी आणि निर्दयी आहेत हे लोकं अशी कमेंट केली आहे. रणधीर कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेल्या पार्टीला आलिया भट्ट, रणबीर कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, नीतू कपूर, तारा सुतारिया, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, संजय कपूर ही मंडळी उपस्थित होते.