मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  यांचा 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi pose) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या याच सिनेमाच्या ट्रेलरचीच चर्चा आहे. आलिया भट्ट या ट्रेलरमध्ये एका दमदार लूकमध्ये दिसत आहे. कणखर आवाज आणि नखऱ्यांमुळे आलिया उठून दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरच्या रिलीजनंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  टी सीरीजच्या ऑफिसबाहेर दिसले. पापाराझीच्या कॅमेऱ्यात रणबीर कैद देखील झाला.


आपल्या गर्लफ्रेंडच्या सिनेमाचा ट्रेलर पाहायला आलेल्या रणबीरने सगळ्यांना एका खास गोष्टीमुळे इंप्रेस केलं. 



रणबीरने गर्लफ्रेंड आलियाच्या सिनेमातील सिग्नेचर स्टेप केली आणि सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. 


या दरम्यान सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत होते. दोघं अनेकदा एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. 



रणबीर कपूरने निळ्या रंगाचा चेक शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसला. ब्लॅक शेड्स आणि मास्क घातलेला रणबीरचा हा लूक खूपच हटके दिसत आहे. त्याचवेळी आलिया भट्टने सफेद रंगाची साडी नेसली आहे. 


३ फेब्रुवारीला ही अभिनेत्री पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या साडीत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. सोबत अजय देवगणही होता. अजयने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. 



हा सिनेमा २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' वर आधारित हा सिनेमा आहे. हे एस हुसैन झैदी यांनी लिहिले पुस्तक आहे. ही कथा आहे कामाठीपुरातील एका साध्या मुलीच्या जीवनावर आधारित आहे.