मुंबई : बॉलिवूडचं एक्स-कपल आणि सध्याचं एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रिण अर्थात दीपिका पादूकोण आणि रणबीर कपूर यांच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. कारण, ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या अगोदर 'बचना ए हसीनो', 'ये जवानी है दिवानी' आणि 'तमाशा'मध्ये दिसलेली ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हा सिनेमा एक रोमान्स ड्रामा असेल. २०२० साली हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा सिनेमा टी सीरिजचे भूषण कुमार लव फिल्मससोबत मिळून निर्मिती करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमासाठी रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोण दोघांनीही होकार दिलाय. परंतु, या दोघांकडून याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


'बचना ऐ हसीनो' या २००८ साली आलेल्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान या दोघांची जवळीक वाढली होती. परंतु, हे नातं दीर्घकाळ टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतर ही जोडी पुन्हा एकदा 'तमाशा' या सिनेमात एकत्र दिसली. या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी त्यांच्या प्रेक्षकांना मिळणार आहे.