रणबीर होम क्वारंटाईन असूनही आलियाच्या पार्टीला असा राहिला उपस्थित
रणबीरचं आलियाला खास बर्थ डे गिफ्ट
मुंबई : आलिया भट्टचा 15 मार्चला वाढदिवस साजरा झाला. या दिवशी करण जोहरच्या (Alia Bhatt Birthday Party) घरी खास बर्थ डे पार्टी प्लान करण्यात आली होती. या पार्टीची जोरदार चर्चा रंगली. या पार्टीला आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर उपस्थित नव्हता. तरी या पार्टीचं आणि रणबीरचं खास कनेक्शन आहे. करण जोहरने अरेंज केलेल्या (Ranbir Kapoor planed surprised party on Alia Bhatt Birthday )या पार्टीचं खास प्लानिंग रणबीर कपूरने केलेलं होतं.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण पार्टीचं आयोजन हे रणबीर कपूरने केलं होतं. त्याने खास आलियाच्या वाढदिवसाला करणच्या घरी सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. आलियाने देखील या अगोदर रणबीरसाठी व्हलेंटाईन बर्थ डे पार्टी अरेंज केली होती. मोठी सरप्राईज पार्टी आणि त्याचं नियोजन झालं असताना अचानक अभिनेता राजीव कपूर यांचं निधन झालं.
यामुळे पार्टीचा सगळा प्लान रद्द झाला. यानंतर आता रणबीरने आलियाकरता ही खास बर्थ डे पार्टी प्लान केली. या पार्टीची जोरदार चर्चा झाली. पण या संपूर्ण पार्टीचं नियोजन रणबीरने केलं होतं. रणबीर कोरोना पॉझिटीव्ह असून तो होम क्वारंटाईन आहे. यामुळे हा पार्टीचा प्लान देखील रद्द होणार होता. पण रणबीरने तसं होऊ न देता सगळा प्लान केला.
कोणासोबत आली आलिया
आलिया भट्ट तिच्या बहिणी शाहीनसोबत पार्टीत आली. शाहिन बर्याच दिवसानंतर आलियाबरोबर आली होती. या कारमध्ये चित्रपट निर्माते शकुन बत्रा देखील आलियाबरोबर दिसले.ॉ
कोण होतं पार्टीत
या पार्टीत अर्जुन कपूर (Arjun Kapoor), मलाइका अरोरा (Malaika Arora), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अयान मुखर्जी (Ayan Mukerji) असे अनेक बॉलिवूड स्टार दिसले. या मिडनाइट ग्रँड बर्थडेचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.